This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
- चौफेर… : •अमर पुराणिक -
लोकनियुक्त सरकार सर्वात श्रेष्ठ असते असे म्हटले असले तरीही अगदीच निरंकुश ठेवलेले नाही. त्याला काही स्वायत्त यंत्रणांचा लगाम लावलेला आहे. या स्वायत्त यंत्रणांशी सरकारचे व्यवहार कसे असतात आणि त्यांचे संबंध कसे असतात यावर सरकारची कारकीर्द किती जबाबदारीने पाळली गेली हे ठरत असते. यात प्रामुख्याने सीबीआय, निवडणूक आयोग, महालेखापाल, संसद आणि न्यायालय यांना प्रताडित करण्याचे अश्‍लाघ्य कृत्य कॉंग्रेसने केले आहे. मग हे कॉंग्रेस सरकार लोकशाहीविरोधी नव्हे का? आता निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. आता कितीही अटापीटा केला तरीही जनता गेली ९ वर्षे केलेली संपुआची दुष्कृत्ये विसरणार नाही. जनतेने या ९ वर्षांत वनवास भोगलाय. भारतीय जनता या सरकारला या निवडणुकीत पराभवाची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. केवळ धूळच चारणार नाही, तर ही संतप्त भारतीय जनता कॉंग्रेसला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.

संपुआचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपल्या कारकीर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपले प्रगतीपुस्तक मोठ्या थाटात सादर केले, पण प्रत्यक्षात प्रगती केलेली नाहीच. अधोगती केलेली असताना प्रगती केल्याचे भंपक दावे मात्र केले आहेत. भारतीय जनता पार्टीने युपीए सरकार दोनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त या अपयशावर नेमकेपणाने बोट ठेवले, पण ते काही कॉंग्रेस नेत्यांच्या गळी उतरले नाही. सरकारने आपल्या कारकीर्दीचे अनाठायी गोडवे गाणारे निवेदन प्रसिद्धीस दिले होते. हे सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेले असतानाही ते बळेच स्वत:च आपल्या कामगिरीवर स्तुतिसुमने उधळून घेत आहे. ही गोष्ट भारतीय जनतेला असाह्यच ठरणारी आहे. साहजिकच भाजपाने या सरकारचे अपयश लोकांसमोर मांडले. त्यात भाजपा नेत्यांची काय चूक? पण कॉंग्रेस पक्षाने भाजपा नेत्यांना आपली दृष्टी साफ करून घेण्याचा सल्ला दिला. भाजपा नेत्यांनी कॉंग्रेसतर्फे आयोजित केल्या जाणार्‍या मोफत नेत्र तपासणी शिबिरात येऊन आपले डोळे तपासून घ्यावेत, असे कॉंग्रेस पक्षाने म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाला आपले कथित यश स्पष्ट शब्दात मांडता येत नाही (की मांडायला काहीच नाही!)आणि हा पक्ष विरोधकांच्या दृष्टीलाच दोष देत असेल तर असा उपरोधीसल्ला देणे आणि असंबद्ध विधाने करणे हेच या कॉंग्रेस पक्षाच्या अपयशाचे द्योतक आहे असे म्हणावे लागेल. कॉंग्रेस पक्षाकडे युक्तिवाद करायला आता काहीही शिल्लक नाही.
वास्तविक पाहता मनमोहनसिंग यांचे हे सरकार विकलांग ठरलेले आहे. ज्या सरकारवर एकामागून एक आरोप होत आहेत. भ्रष्टाचाराची मालिका समोर येत आहे. सहा मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या कुरणात यथेच्छ चरल्यामुुळे घरी जावे लागले. आता पंतप्रधानही भ्रष्टाचाराच्या आरोपात लिप्त असल्याचे स्पष्ट होत आहे. या भ्रष्टांचे मूळ सोनिया गांधी आहेत हेही यथावकाश सिद्ध होईल.
विकासाचा दर कमी झाला आहे. चलनवाढ रोखता आलेली नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. सहा मित्र पक्षांनी साथ सोडल्यामुळे ज्या सरकारला आपले बहुमत टिकवणे शक्य होत नाही. असे हे अपयशी आणि देशातले सर्वात भ्रष्ट सरकार आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नसल्यागत दुसर्‍यांच्या डोळ्यातले कुसळ काढायला निघाले आहे.
मनमोहनसिंग यांनी काही वेळा ठोस निर्णय घेत असल्याचा आव आणून आपण आता धोरण लकव्यातून बाहेर पडणार आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात कोणी ना कोणी अशी अडचण आणली की, त्यांचा एकही प्रयत्न पुढे श्‍वास घेऊ शकला नाही. सरकारच्या अशा कामांमध्ये विरोधी पक्षांचा अडथळा आहे असे आवई उठवत आहेत, परंतु मनमोहनसिंग यांना विरोधी पक्षांपेक्षाही मित्रपक्षांनी अधिकवेळा रोखले. कधी मुलायमसिंह कधी मायावती कधी ममता बॅनर्जी तर कधी करूणानिधी. अशा सर्व मित्र पक्षांनी पंतप्रधानांना नेहमीच खो दिला. मित्रपक्षांचे हे अडथळे कमी पडले म्हणून की काय मनमोहनसिंग यांना स्वपक्षीयांचेही अडथळे सहन करावे लागले आणि सर्वात दुर्दैवाची बाब म्हणून मनमोहनसिंग ज्यांच्या कृपेमुळे पंतप्रधान झाले त्या सोनिया गांधी यांनी सुद्धा मनमोहनसिंग यांना प्रत्येकवेळी मागे खेचले. पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग दुबळे ठरले. ते यातला कोणताही अडथळा दूर करू शकले नाहीत. आजपर्यंतची आठ वर्षे लोकांनी मनमोहनसिंग यांना सहन केले. कारण ते एक सभ्य गृहस्थ आहेत आणि स्वतः भ्रष्ट नाहीत असा लोकांचा समज होता.
सरकारच्या विरोधात अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जवळपास १७  मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. ९ वर्षांत ५ लाख कोटी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आले. कॉंग्रेस पक्ष बदनाम झाला. सोनिया गांधी आपल्या जावयामुळे बदनामी झाल्याचा आव आणत आहेत, पण सोनिया गांधी या सर्व भ्रष्टाचारी सरकारचे मूळ आहेत, परंतु मनमोहनसिंग मात्र आपली प्रतिमा राखून होते. या ९ वर्षातल्या शेवटच्या वर्षात मात्र संपुआ सरकारची ही बाजूसुद्धा टिकली नाही. मनमोहनसिंग यांना आपली स्वच्छ प्रतिमा अबाधित ठेवता आली, पण शेवटच्या वर्षात त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मनमोहनसिंगही त्यातलेच निघाले.
त्या आरोपाचा चिखल आपल्यावर उडू नये यासाठी सरकारने सीबीआयच्या अहवालात ढवळाढवळ केली. एरवी तीही खपून गेली असती, परंतु या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयानेच ताशेरे ओढले. त्यामुळे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार या सरकारच्या या दुष्कीर्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब झाले आणि नववे वर्ष संपता संपता सरकारचे अक्षरशः वस्त्रहरण झाले.
सरकार स्थापन झाले तेव्हा त्याला १२ पक्षांचा पाठिंबा होता, परंतु एकेका पक्षाने सरकारपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि आता सरकारच्या पाठीमागे केवळ ५ पक्ष उरले आहेत. त्यातलेही दोन पक्ष पूर्णपणे बेभरवशाचे आहेत. म्हणजे संपुआ सरकारची ही नौका कोणत्याही क्षणी बुडू शकते अशी स्थिती आलेली आहे. ९ वर्षांचे सरकारचे हे प्रगतीपुस्तक म्हणजे अधोगती पुस्तकच ठरले आहे. काही छोट्या राज्यामध्ये आणि कर्नाटकामध्ये सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला यश मिळाले असले तरी सर्वसाधारणपणे देशभरातील मतदारांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या या भ्र्र्रष्ट सरकारविषयी तीव्र नाराजीची भावना आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. कारण सामान्य माणसाचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा असलेला महागाईचा प्रश्‍न या सरकारला सोडविता आलेला नाही. हा महागाईचा त्रास आता जनतेला सोसवण्यापलीकडे गेला आहे. महागाई लवकरच कमी होईल असे आश्‍वासन मनमोहनसिंग गेल्या ९ वर्षांत सतत देत आहेत. आश्‍वासन देऊनही ते न पाळणे आणि महागाई वाढवत नेणे हा सरकारचा नियमित कार्यक्रम जारी राहिला. जो देशातल्या सर्वसामान्य माणसाला ‘आम आदमी’ला आपली कुचेष्टा केल्यासारखे वाटत आहे. ‘कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ’ असे म्हणत सत्ता ओरबडून खाणार्‍याकॉंग्रेसवर लोक चिडलेले आहेत.
आपल्या घटनेने लोकनियुक्त सरकार सर्वात श्रेष्ठ असते असे म्हटले असले तरीही त्याला अगदीच निरंकुश ठेवलेले नाही. त्यालाही काही स्वायत्त यंत्रणांचा लगाम लावलेला आहे. या स्वायत्त यंत्रणांशी सरकारचे व्यवहार कसे असतात आणि त्यांचे संबंध कसे असतात यावर सरकारची कारकीर्द किती जबाबदारीने पाळली गेली हे ठरत असते कारण या संबंधांवरच आपल्या लोकशाहीचे स्थैर्य अवलंबून असते. यात प्रामुख्याने सीबीआय, निवडणूक आयोग, महालेखापाल, संसद आणि न्यायालय यांना प्रताडित करण्याचे अश्‍लाघ्य कृत्य कॉंग्रेसने केले आहे. मग या कॉंग्रेसला लोकशाहीवादी कसे म्हणावे असा प्रश्‍न पडतो.
या सरकारमध्ये चालणार्‍या अनेक गैरप्रकारांना महालेखापालांच्या अहवालामुळे वाचा फुटली. तशी ती फोडणे हे त्यांचे कर्तव्यच आहे, पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांचाही मान राखला नाही. महालेखापालांचा हिशेब चुकला असेल तर तसे दाखवायला हरकत नाही, पण त्यांनी सत्य सांगितले म्हणून अस्वस्थ झालेल्या कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्यावरच चूकीचे आरोप केले.
लोकशाहीत संसद ही सर्वश्रेष्ठ आहे, पण या संसदेच्या सन्मानाची यथेच्छ पायमल्ली केली. विरोेधी पक्ष संसदेच्या कामकाजात अडथळे आणतात असा बीनबोभाट आरोप करत स्वत:च गोंधळ घातला. सत्ताधारी पक्षाने सदनात गोंधळ करायचा नसतो. पण एक दोनदा असे आढळले की, सोनिया गांधीच आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना गोंधळासाठी चिथावत आहेत. त्यांचे हे कृत्य आपल्या जबाबदारीला सोडचिठ्ठी देणारे आहे.
या सरकारने निवडणूक आयोगाचा अधीक्षेप केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी सरळ सरळ जातीयवादी प्रचार केला. निवडणूक आयोगाने त्यांना तंबी दिली, पण सलमान खुर्शीद हे कायदा मंत्री असतानाही त्यांनी या तंबीला दाद तर दिली नाहीच, पण आपण असा जातीयवादी प्रचार करणारच असे ठासून जाहीर केले. यावर आयोगाला राष्ट्रपतींकडे तक्रार करावी लागली. जातीयवादी प्रचार करून उलट आयोगालाच दमात घेत लोकशाहीविरोधी कृत्य करणार्‍या सलमान खुर्शीद यांना या सरकारने शब्दानेही या अपराधाची जाणीव करून दिली नाहीच, पण उलट त्यांना बढती देऊन परराष्ट्र मंत्री केले. याला म्हणतात सेक्युलरवादाचा लोचट पुळका!
न्यायालय ही स्वायत्त यंत्रणा आहे, पण या यंत्रणेचा अवमान करणे, तिच्या कामात हस्तक्षेप करणे आणि न्यायालयाचे आदेश धुडकावणे असे अनेक प्रकार या सरकारने केले. संपुआ सरकारच्या काळात सरकार आणि न्यायालय यांच्यात अनेकदा वादाचे विषय आले. सीबीआय या यंत्रणेच्याही कामात सरकारने हस्तक्षेप केला. ही गोष्ट तर सरकारने शपथपत्रावर मान्य केली. शेवटी न्यायालयाने सरकारला तंबी दिली. पण सरकारने ही देखील मर्यादा पाळली नाही. घटनेच्या मूलतत्त्वांशी म्हणजेच लोकशाहीशी प्रतारणा केली.
सरकार आणि त्याचे मंत्री निरंकुश झाल्याचेही काही अभ्यासक म्हणत आहेत.  पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. हे सरकार जनतेच्या प्रश्‍नांबाबत निरंकुश वागतेय. पण या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सरकारच्या रथाचे सारथ्य कोणी तरी महाभ्रष्ट करत आहे. हे म्होरके कोण आहेत हे सर्व जगाला माहिती आहे. पण थेट कोणी बोलत नाहीत. लवकरच हे महारथी कोण हे समोर येईलच. आता निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. आता कितीही अटापीटा केला तरीही जनता गेली ९ वर्षे केलेली संपुआची दुष्कृत्ये विसरणार नाही. जनतेने या ९ वर्षांत वनवास भोगलाय. भारतीय जनता या सरकारला या निवडणुकीत पराभवाची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. केवळ धूळच चारणार नाही, तर ही संतप्त भारतीय जनता कॉंग्रेसला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.
 •विक्रम श्रीराम एडके -
हे योग्य नाही मित्रहो! आपल्याकडील सर्वच महापुरुषांच्या चरित्रात सहस्रावधी पे्ररणास्रोत आहेत. द्वेष करण्या, बोलण्या, पाहण्यापेक्षा उठा, जागे व्हा आणि त्या प्रेरणास्रोतांचा शोध घ्या. आचरणात आणा. स्वत: तर सामर्थ्यशाली व्हाच, पण देशालाही शक्तीशाली बनवा. स्वा. सावरकरांच्या रोमहर्षक चरित्रातला एक पैलू मी आज तुमच्यासमोर उलगडला. तुम्हीही असे पैलू शोधा. आता सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर संकल्प करा. सावरकरांचा आदर्श अंगी बाणवा आणि त्यांच्यासारखेच भरतभूमीचे नाव त्रिखंडात गाजवा! तुम्ही हे करु शकता!! तुम्हीच हे करु शकता!!!

लंडनमध्ये ‘अभिनव भारत’च्या सदस्यांची धरपकड सुरु असताना स्वत: स्वा. सावरकर पॅरिसला होते. अर्थातच ब्रिटीश साम्राज्याला जो ‘भूतो न भविष्यति’ असा धोका निर्माण झाला होता. त्याचे मूळ हा अवघे २७ वय असलेला तरुणच असल्याचे ब्रिटीशांना माहिती होते; परंतु सावरकर ब्रिटीश भूमीवर नसल्याने त्यांना पकडणे इंग्रजांच्या आवाक्याबाहेरचे काम होते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, या स्थितीत त्यांना पकडणे इंग्रजांना कधीच शक्य होणार नव्हते. आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार सावरकरांना फ्रान्समध्ये आश्रय घेण्याचा पूर्णत: अधिकार होता व इग्लंड आणि फ्रान्स यांच्यात अपराध्यांच्या हस्तांतरणाचा करारही नव्हता. एकीकडे सावरकरांच्या सहकार्‍यांचा अतोनात छळ सुरु होता. तर दुसरीकडे फ्रान्समधील सहकारी सावरकरांना इंग्लंडला परत न जाण्यासाठी विनवत होते. सावरकरांवर बिनबुडाचा आरोप करत सावरकरद्वेष करणार्‍यांनी याप्रसंगी सावरकरांनी काढलेले उद्गार लक्षात ठेवावेत -‘‘माझ्या सहकार्‍यांचा नि अनुयायांचा छळ मला पाहवणार नाही. ओढवलेल्या संकटाला नेता म्हणून मी स्वत:च तोंड दिले पाहिजे’’ (वीर सावरकर-धनंजय कीर, अनु.-द.पां. खांबेटे, आ.२००८, पृ.८३). सावरकर दि.१३ मार्च १९१० रोजी लंडनला आले. त्यांना तत्काळ अटकही करण्यात आली.
आता यात वैधानिक (कायद्याची) मेख अशी की, सावरकरांना या जॅक्सनच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याचा खून झाला होता भारतात. त्यावेळी सावरकर होते इंग्लंडमध्ये. नियमानुसार खटला इंग्लंडमध्येच चालायला हवा होता, पण तसे न करता सावरकरांना भारतात पाठवावयाचे ठरले. असे का केले असेल बरे? याचे उत्तर मिळते श्री. डेव्हिड गार्नेट यांच्या आत्मचरित्रात. श्री. गार्नेट लिहीतात की, ‘जर इथे (इंग्लंडमध्ये) खटला चालला असता तर नियमाप्रमाणे सावरकरांना फार-फार तर २-३ वषार्र्ची शिक्षा झाली असती. परंतू भारतात खटला चालवला तर गोष्ट वेगळी’ (द गोल्डन एको – डेव्हिड गार्नेट; हरकोर्ट, ब्रास आणि कंपनी, न्युयॉर्क, १९५४, पृ. १५३). ब्रिटीश सरकार सावरकरांना इतके घाबरुन असे की, त्यांच्यापायी नियमही वाकवायला मागे-पुढे पाहत नसे, हेच यावरुन सिध्द होते. ब्रिटीशांच्या मनातील हीच धास्ती नियम डावलून सावरकरांना दोन स्वतंत्र जन्मठेपी देण्याच्या निर्णयातही दिसते!
त्यानुसार सावरकरांना भारतात पाठविण्यासाठी दि.१ जुलै १९१० रोजी ‘आर. एम. एस. मोरिया’ या नौकेवर चढविण्यात आले (स्वा. सावरकर चरित्र – शि.ल. करंदीकर, वरदा प्रकाशन, आ.२०११, पृ.२७९). हीच ती मोरिया नौका जिच्या पोर्टहोलमधून सावरकरांनी ती त्रिखंडात गाजलेली उडी मारली.
अमेरिकास्थित भारतीय वंशाच्या संशोधिका श्रीमती अनुरुपा सिनार यांनी अथक परिश्रम आणि उद्बोधक संशोधन करुन या उडीची हकीकत जगासमोर आणली आहे. ८ जुलै १९१० रोजी मोरिया जहाज फ्रान्समधील मार्सेल्स बंदरात उभे होते. सकाळी ६:१५ चा सुमार. सावरकरांनी शौचास जाण्याची परवानगी मागितली. त्याप्रमाणे त्यांना शौचालयात नेण्यात आले. पार्कर नावाचा पहारेकरी बाहेर थांबला. सावरकरांनी आत प्रवेश करताच अजिबात आवाज न होऊ देता कडी लावून टाकली. अंगातील बाथरोब दरवाज्याला असलेल्या काचेच्या झरोक्यावर टाकला. जहाजाला हवा आणि प्रकाश येण्यासाठी अनेक गोलाकृती खिडक्या असतात. त्यांना पोर्टहोल असे म्हणतात. असे एक पोर्टहोल शौचकुपाच्यावर होते सावरकरांनी चष्मा इ. गोष्टी काढून बाजूला ठेवून दिल्या. यज्ञोपविताने अंदाज घेतला आणि त्या सुमारे १३ इंच परिघ असलेल्या पोर्टहोलमधून कसेबसे शरीर झोकून दिले. तोपर्यत इकडे पहार्‍यावर अमरसिंह नावाचा शिपाई आलेला होता. आतील हालचालीमुळे त्याने डोकावून पाहिले. तर सावरकर अर्धे आत आणि अर्धे पोर्टहोलमधून बाहेर! तो घाबरला. तसाच वरिष्ठांना बोलवायला धावला. तोवर सावरकरांनी स्वत:ला खाली झोकून दिले होते.
विचार करा. जहाज ते धक्क्याची भिंत यामधील अंतर जेमतेम ७ फुटच होते. सावरकर जरा वेडेवाकडे पडले असते तर भिंतीला आपटून कपाळमोक्ष तरी झाला असता अथवा हातपाय तरी मोडले असते. बरं, पोर्टहोल ते पाणी ही उंची सुमारे ३० फुट. पाणी किती खोल, सावरकरांना ठाउकही नव्हते. पाणी उथळ असले तर?  शिवाय ३० फुटांवरुन पडल्यानंतर पाण्याचा, त्यातही समुद्राच्या पाण्याचा फटका किती जोरात बसणार होता, याची कल्पना पट्टीचे पोहणारेच करु शकतात. त्या फटक्याने सावरकर पुन्हा त्या धक्याच्या  भिंतीला अथवा जहाजाला आदळले असते तर? हा सारा विचार केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, सावरकरद्वेष्टे काहीही म्हणोत, पण ती उडी अत्यंत भयानक होती. सिंहाचे काळीज असलेला माणूसच हे साहस करु जाणे. सावरकर तर साक्षात नरसिंहच होते!
पाण्यात पडल्यावर सावरकर पोहत-पोहत धक्क्याच्या भिंतीपाशी गेले. धक्क्याची भिंतही सुमारे ९ फुट उंच होती. शिवाय सतत पाण्याशी संपर्क येऊन ती निसरडीही झाली असणार. त्याही परिस्थितीत सावरकर वर चढले, हे त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीकच नव्हे काय?
वर येताच सावरकर पळत निघाले. प्रेन्स्की नामक फे्रंच पोलिस अधिकारीही बंदरावरच होता. सावरकरांनी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण सावरकरांची भाषा त्याला समजलीच नाही. तोपर्यत बंदरावर पोहोचलेल्या इंग्रज पहारेकर्‍यांनी सावरकरांना पकडून पुन्हा एकवार नौकेवर नेले. हे सारे वाचून सावरकरांची उडी म्हणजे एक फसलेले साहस होते, असा तुमचा समज होणे साहजिकच आहे. परंतू याचा खोलवर विचार करुयात.
पळून जाणे एवढाच सावरकरांचा उद्देेश असेल असे वाटत नाही, कारण तसे असते तर सावरकर मुळात फ्रान्सहून इंग्लंडला अटक करुन घेण्यासाठी आलेच नसते. त्यामुळे सुटका होऊ शकली तर गाजावाजा होऊन भारतीय स्वातंत्र्यलढा सबंध जगाला कळणार होता, पण न झाल्यास सावरकरांकडे ‘प्लॅन बी’ तयारच होता. आणि तो इतका अप्रतिम होता की, इंग्रजांच्या नाकीनऊ येणार होते. त्याचे परिणाम दुसर्‍याच दिवशीपासून दिसू लागले.
मी आधीच सांगितल्याप्रमाणे, सावरकरांना फ्रान्समध्ये आश्रय घेण्याचा पूर्ण अधिकार होता व फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात अपराध्यांच्या हस्तांतरणाचा करारही नव्हता. जरी तसा करार असता, तरीही आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार याचक देशाने विनंती केल्याशिवाय असे हस्तांरतण करताही येत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, इंग्रज पहारेकर्‍यांनी फ्रान्सच्या किनार्‍यावरुन सावरकरांना पकडून नेणे ही गोष्ट ढळढळीत बेकायदेशीर होती! दुसर्‍याच दिवसापासून युरोपभरातल्या वृत्तपत्रांत बातम्या झळकू लागल्या. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम सगळीकडच्या वृत्तपत्रांनी ब्रिटीश सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढायला सुरुवात केली. युरोपच नव्हे तर अल्पावधीतच हे लोण सार्‍या जगात पसरले. भाग्यनगर (हैद्राबाद) येथील प्राध्यापक श्री.प्र.ह. हयातनगरकर यांनी या सार्‍या बातम्या व्यवस्थित नोंदविल्या असून त्या ‘वीर सावरकर-चावट की वात्रट’ (ले.-डॉ.प.वि. वर्तक, वर्तक प्रकाशन) या ग्रंथात पृ.५० ते ५५ येथे उपलब्ध आहेत. जागेअभावी त्यातील तीनच मुद्दे येथे देतो, म्हणजे वाचकांना कल्पना येईल की, वृत्तपत्रांनी ब्रिटीशांची कशी बिनपाण्याने चालवली होती -
१)‘‘ब्रिटीश पोलिसांच्या कृतीने ‘असायलम’च्या कायदयाची थट्टाच मंाडली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवून त्यांची टवाळीच केली आहे.’’
-द डेली न्यूज, इंग्लंड (२२ जुलै १९१०)
२)‘‘इंग्लंड आजवर जगाला नीती शिकवत असे. परंतु आता त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे.’’
-बलिर्र्न पोस्ट, जर्मनी (१२ जुलै १९१०)
३)फ्रान्सच्या ‘ल ह्‌युमनाईत’ने तर थेट ‘हा फ्रान्सच्या रायक्रांतीशी दगा आहे’ असा मथळाच दि. १२ जुलै १९१० रोजी दिला होता. (आकृती क्र.३)
ब्रिटनमध्ये असलेल्या स्पेन, पॅराग्वे, पोर्तुगाल इ. देशांच्या राजदुतांनी तीव्र विरोध नोंदवला. पार रशिया, जपान इ. देशांतही सावरकरांची सुटका झालीच पाहिजे अशा अर्थाचे ठराव मांडले गेले. इंग्लंड आणि फ्रान्सचे राजनैतिक संबंधही ताणले गेले. तेही दोन्हीपैकी एकाही देशाचे नागरिक नसलेल्या स्वा. सावरकरांमुळे! सुमारे दोन महिने आंतरराष्ट्रीय राजकारणात असा गोंधळ चालू होता. जे इंग्लंड सावरकरांना भारतात पाठवून मनमानी करु इच्छित होते, त्याच इंग्लंडला अखेरीस हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढवणारा एक पक्ष होणे भाग पडले. पुढे जरी इंग्लंडच्या क्लृप्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल सावरकरांच्या विरोधात गेला असला तरी जनमताचा रेटाच एवढा जबरदस्त होता की, निकालानंतर अवघ्या तीनच दिवसांत फ्रान्सचे पंतप्रधान श्री. बियॉं यांना त्यागपत्र देणे भाग पडले!
थोडक्यात कायद्याची बारीक जाण असलेल्या सावरकरांनी विचारपूर्वक केलेल्या एका खेळीमुळे इंग्लंडची जगभर नाचक्की झाली. सावरकर सर्वांचे हिरो झाले आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे इतिहासात पहिल्यादांच भारतीय स्वातंत्र्यलढयाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. नंतरही सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सन्माननीय स्थान अढळच राहिले. पहिल्या महायुध्दाच्या काळात सावरकर अंदमानात असताना जर्मनांनी आपली एम्डेन ही युध्दनौका सावरकरादींच्या सुटकेसाठी धाडली होती (करंदीकर, पृ.३९०). सावरकरांच्या या स्थानाचा उपयोग भविष्यात सुभाषबाबूंनाही झालेला दिसतो.
२८मे रोजी स्वा.सावरकरांची जयंती जगभर साजरी केली जात आहे. पण आपली अवस्था काय आहे? फारसा उज्वल इतिहास नसलेले पाश्‍चात्य देश, त्यांच्याकडे आहे तो ठेवाही किती उत्साहाने जतन करतात. ‘हा पहा अमक्या राजाच्या तेराव्या राणीच्या पाचव्या दासीच्या गळयातील हार’ वगैरे म्हणतानाही त्यांचा उत्साह कसा ओसंडून वाहात असतो. परंतु आपण मात्र आपल्याच महापुरुषांना खुजे ठरविण्याचा प्रयत्न करीत असतो की काय न कळे! त्यातही काही तथाकथित पुरोगामी संघटनाच या महापुरुषांना जाती-पातीची लेबले लावतात तेव्हा तर अक्षरश: किळस येते! आज केवळ सावरकरांच्या द्वेषावरच याची दुकाने चालतात, असाही एक वर्ग आहेच की भारतात! सावरकरांनी ही सारे जग दुमदुमून सोडणारी उडी काय केवळ त्यांच्या जातीसाठीच मारली होती का हो? नाही ना? देशासाठीच केले ना त्यांनी हे जीवघेणे साहस? मोठया खेदाने म्हणावेसे वाटते, आपल्याला एवढी मोठी परंपरा आहे की, अखेरीस किंमतच राहिली नाहीये तिची आपल्याला.
हे योग्य नाही मित्रहो! आपल्याकडील सर्वच महापुरुषांच्या चरित्रात सहस्रावधी पे्ररणास्रोत आहेत. द्वेष करण्या, बोलण्या, पाहण्यापेक्षा उठा, जागे व्हा आणि त्या प्रेरणास्रोतांचा शोध घ्या. आचरणात आणा. स्वत: तर सामर्थ्यशाली व्हाच, पण देशालाही शक्तीशाली बनवा. स्वा. सावरकरांच्या रोमहर्षक चरित्रातला एक पैलू मी आज तुमच्यासमोर उलगडला. तुम्हीही असे पैलू शोधा. आता सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर संकल्प करा. सावरकरांचा आदर्श अंगी बाणवा आणि त्यांच्यासारखेच भरतभूमीचे नाव त्रिखंडात गाजवा! तुम्ही हे करु शकता!! तुम्हीच हे करु शकता!!!
अमर पुराणिक
 आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कार्यशैलीचा उभ्या महाराष्ट्राला चांगलाच परिचय झालेला आहे. ते शांत स्वभावाचे अन् आक्रमक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अभ्यासू, अजातशत्रू, धोरणी आणि अनुभवीही असणारे देवेंद्र फडणवीस यांंची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने महाराष्ट्र भाजपात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत तर केलेच, पण नागरिक आणि बिगर भाजपामतदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेश भाजपाध्यक्षपदी निवड झाल्याचा ‘योग्य व्यक्ती निवडला’ अशा शब्दात आनंद व्यक्त केला. हीच बाब महाराष्ट्र भाजपाच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरली आहे. भाजपा श्रेष्ठींनी लहान वयात दूरदृष्टी लाभलेलं युवा नेतृत्व महाराष्ट्राला दिले ही महाराष्ट्रवासियांसाठी उज्वल भविष्याची नांदी ठरेल यात शंका नाही. 

देवेंद्र फडणवीस...! फक्त नावच पुरे. कारण देवेेंद्र फडणवीस यांचे कामच तसे आहे. आजपर्यंत त्यांच्या प्रभावी कार्यशैलीचा उभ्या महाराष्ट्राला चांगलाच परिचय झालेला आहे. ते शांत स्वभावाचे अन् आक्रमक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अभ्यासू, अजातशत्रू, धोरणी आणि अनुभवीही असणारे देवेंद्र फडणवीस यांंची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने महाराष्ट्र भाजपात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत तर केलेच, पण नागरिक आणि बिगर भाजपामतदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेश भाजपाध्यक्षपदी निवड झाल्याचा ‘योग्य व्यक्ती निवडला’ अशा शब्दात आनंद व्यक्त केला. हीच बाब महाराष्ट्र भाजपाच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरली आहे. भाजपा श्रेष्ठींनी लहान वयात दूरदृष्टी लाभलेलं युवा नेतृत्व महाराष्ट्राला दिले ही महाराष्ट्रवासियांसाठी उज्वल भविष्याची नांदी ठरेल यात शंका नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपली अमीट छाप पाडणारे भाजपाचे युवा नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड म्हणजे येत्या निवडणुकीत  भाजपा-शिवसेना-रिपाइंचा सत्ताधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी तारुण्यावस्थेत आणि राजकारणात एकाच वेळी प्रवेश केला. बालपणापासूनच घरातूनच राष्ट्रीय विचारांचे बाळकडू मिळाले. देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस हे हडाचे संघ, भाजपा कार्यकर्ते, ते नागपूर पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले होते. महाविद्यालयातील निवडणुकांपासून ते वॉर्ड अध्यक्ष, मंडल भाजपाध्यक्ष, प्रदेश युवा मोर्चा, राष्ट्रीय युवा मोर्चा, भाजपा नगरसेवक, महापौर, पहिले मेयर इन कौन्सिल आणि त्यानंतर आमदार, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत देवेंद्र फडणवीस यांनी आम जनतेलाही मोहून घेतले. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी ते नगरसेवक झाले तर २६ व्या वर्षी महापौर झाले. असा राजकारण आणि समाजकारणाचा गाढा अभ्यास असलेला झंझावाती नेता प्रदेश भाजपाध्यक्षपदी विराजमान होणे यात आजच भाजपाला अर्धे यश मिळाल्यासारखे आहे.
मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौर्‍यावर आ. देवेंद्र फडणवीस आले असता त्यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळाली. तरुण भारतच्या वाचकांसाठी देवेंद्रजींशी संवाद साधला असता त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने माझ्याशी वार्तालाप केला.
यावेळी बोलताना आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली, गोपीनाथ मुंंडे साहेबांनी पुढाकार घेतला, नितीन गडकरी साहेबांनी होकार दिला आणि सर्वांनीच माझ्या निवडीला पसंती दर्शवली. पक्ष हा एका नेमक्या दिशेने जातोय हे माझ्या निवडीने प्रथम अधोरेखित केले आहे. माझ्या समोर अनेक प्रश्‍न आहेत, मला वाटते की, सध्याचे जे सरकार आहे ते जनतेच्या मनातून पूर्णत: उतरलेले आहे. जनतेला हे सरकार आता नको आहे. आता जनतेला सक्षम पर्याय हवाय आणि तो पर्याय आम्ही आहोत, हे जनतेच्या मनावर बिंबवणं हे माझ्या समोरचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी ‘अनकॉम्प्रोमायझिंग पार्टी’, अर्थात कोणत्याही प्रकारचा समझोता न करणारा पक्ष अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची जडण घडण आम्हाला करायची आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये काही राजकीय समझोते आम्हाला करावे लागतात, पण जनतेच्या हिताविरुद्ध जाऊन कोणत्याही परिस्थितीत आम्ही समझोते करणार नाही,’ ही गोष्ट आ. देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की, जनतेच्या हिताकरिता एखादी राजकीय खेळी म्हणून एखादी गोष्ट करावी लागली तर ती करु. आम्हाला शिवछत्रपतींच्या गनिमीकाव्याचा वारसा आहे. आम्हाला जनतेच्या हितासाठी गनिमीकावा करावा लागतो. जनतेच्या हितासाठी करूही, पण जनतेच्या हिताविरुद्ध काय वाट्टेल ते झाले तरीही समझोता करायचा नाही यावर पार्टी ठाम असल्याचे आ. फडणवीस यांनी निक्षून सांगितले.
दुसरी गोष्ट अशी की, निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाशी मोठ्याप्रमाणात युवावर्ग जोडणे हे आमचे मोठे अभियान आहे. पक्ष मजबूत आहे, गावोगावी युवा कार्यकर्तेदेखील आहेत, पण अधिक प्रमाणात पक्षाशी युवा जोडणे आणि त्या युवकांना हा माझा पक्ष आहे, माझ्या ज्या आशा, आकांक्षा आहेत त्यांची पूर्तता करण्याची शक्ती केवळ भाजपात आहे, असा आत्मविश्‍वास तरुणांमध्ये निर्माण करून एक सकारात्मक चित्र आम्ही निश्‍चितपणे तयार करू, असा आत्मविश्‍वास आ. फडणवीस यांनी व्यक्त केला. एका बाजूला आम्ही युवकांना जोडायचं असं म्हणतो त्याचबरोबर आम्ही केवळ विरोधी पक्षात आहोत म्हणून बोट दाखवणार नाही. प्रश्‍न मांडणे हे आमचे काम आहे, पण अनेक वेळा विरोधीपक्ष प्रश्‍न मांडतो त्यावर उपाय आहेत का?असं विचारल जातं, याचं उत्तर आहे आमच्याकडे, प्रत्येक समस्येवर उपाय आहेत. जर भाजपाचं राज्य आलं, तर महाराष्ट्राला काय करायचं आहे, कोठे न्यायचे आहे याची ब्लू प्रिंट भारतीय जनता पक्षाकडे तयार आहे. आम्ही समस्या मांडत असताना त्या समस्येवर उपाय देखील सांगतो. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याकरिता आज सगळ्यात मोठी अडचण ही प्रशासनिक अकार्यक्षमता आहे. कोठेही सरकारमध्ये प्रशासनिक क्षमता आणि आत्मविश्‍वास या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत. आम्ही ‘टेस्टेड’ आहोत, कारण सहा वर्षे भाजपाचे केंद्रातील सरकार आणि साडेचार वर्षे महाराष्ट्र राज्यातले भाजपा-शिवसेनेचे युती सरकार या दोन्ही सरकारच्या परफॉर्मन्सबद्दल कोणीच वाईट म्हणत नाही. काही चुका झाल्या असतील म्हणून आम्हाला सत्तेतून बाहेर जावं लागलं, पण असं कोणी म्हणत नाही की, आमचे नाकर्ते सरकार आहे. लोक अजूनही आमच्या सरकारच्या दमदार कारकीर्दीबद्दल बोलतात. त्यामुळं आम्ही आता ‘ट्राईड अँड टेस्टेड’ आहोत. आता आम्ही ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून त्यातून शिकून अधिक चांगल्या प्रकारचं राज्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे जनतेला आम्ही समजाऊन सांगू, पटवून देऊ.
अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की, भाजपा-शिवसेना आणि रिपाइं युतीनीच आम्ही निवडणुकीला समोरे जाणार आहोत, पण हे करत असताना एक ‘लार्जर अलाईन्स’ देखील विरोधकांचा व्हावा, असा प्रयत्न देखील आम्ही करू. तो कुठल्या प्लॅटफॉर्मवर व्हावा, युती करावी की अजून काही करावं, ते आज नाही सांगता येत, पण आमचा तसा प्रयत्न सुरू असणार असल्याचे आ. फडणवीस यांनी स्पष्ट केले. याचं कारण सांगताना फडणवीस म्हणाले की, हे जे सरकार सत्तेवर आहे ते सरकारविरोधी मतांमध्ये फुट पडल्यामुळे आले आहे. या सरकारला ३०, ३३ टक्के मतं आहेत आणि जवळजवळ ६७ टक्के मतं ही त्यांच्या विरोधात आहेत. तर या मतांमध्ये विभागणी झाली आहे. सरकारविरोधी मतांच्या विभागणीचा फायदा मिळून हे निष्क्रीय सरकार पुन्हा येऊ, नये असा आमचा प्रयत्न असेल आणि त्याकरिता केवळ आमचीच जबाबदारी नाही, तर जे लोक म्हणतात की, हे सरकार जनविरोधी आहे; त्यासर्वांनीच विरोधी मतांची फुट टाळली पाहिजे, असे आवाहन आ. देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज हा आमचा पहिला प्रयोग असणार नाही. या देशात असे अनेक प्रयोग झाले, ७७ साली हा प्रयोग झाला, ८९ साली असा प्रयोग पाहिला, ९१ साली पाहिला, ९६ साली पाहिला. अनेक वेळा असे प्रयोग झालेला आहे आणि त्याच्यामुळे कुठल्या न कुठल्या पायावर विरोधकांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी आमची युती मात्र भाजपा, सेना आणि रिपाइं युती राहणार आहे.
भाजपा राजनिती खेळण्यात कमी पडते का? या प्रश्‍नावर बोलताना फडणवीस  म्हणाले, ‘नाही मुळात आमच्या पक्षाचा पायाच सामाजिक आहे. समाजकारणावर आधारित आहे, ते राजकीय नाहीच आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनाही शिकवत असतो की, राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे आणि राजकारण किंवा सत्ता हे आपलं साध्य नाही ते साधन आहे, ज्या माध्यमातून जनतेचा, समाजाचा विकास साध्य करायचा आहे. आम्हाला मिळालेलंं बाळकडूच राजकीय नाहीय, तर आमची पठडी सामाजिक आहे. ही गोष्ट खरी आहे की प्रचलित घसरलेल्या हीन राजकारणात आम्ही कमी पडतो, पण प्रचलित राजकारण हे समाजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्ताकारणाचं राजकारण झालं आहे’, अशी खंत व्यक्त करून फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्ताकारण फारसे शिकलेलो नाही, पण आता त्याही परिस्थितीत आम्ही जगायला शिकायला लागलोय.
आज भाजपा ही लोकांची गरज आहे. कॉंग्रेसने ५० वर्षांच्या सत्ता काळात जे केले नाहीत त्याहून अनेक पट अधिक काम भाजपाने ५ वर्षांच्या सत्ता काळात करून दाखवले आहेत. अभ्यासक, पत्रकार, तज्ज्ञ सोडून सर्वसामान्य माणूसही भाजपा सत्ताकाळातील ८,१० मोठे प्रोजेक्ट धाडाधड सांगतो. असा विद्वान आणि समाजाचे हित साधणारा पक्ष राजकारण खेळल्याशिवाय सत्तेत येत नसेल, तर मग त्यालाही राजकारण खेळावेच लागेल असे वाटत नाही का?
या बद्दल बोलताना फडणवीसांनी सांगितले की, नाही तसं नाही भाजपाचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मध्यप्रदेशात पहिल्यांदा सत्तेत आलो नंतर काही अडचणी झाल्या, सत्तेतून गेलो, नंतर पुन्हा सत्तेत आलो आणि आजपर्यंत गेलो नाही. गुजरातमध्ये सत्ता मिळाली, नंतर सत्ता गेली आणि नंतर पुन्हा सत्ता आली, तर आजपर्यंत तेथेही कायम सत्ता भाजपाचीच आहे. राजस्थानमध्ये आता तीच स्थिती येणार आहे. छत्तीसगडमध्ये तीच स्थिती आहे. त्यामुळे असे दिसून येते की, पहिल्यांदा आम्हाला सत्ताकारणाचा अनुभव कमी पडतो. आम्ही विकास हा खूप करतो. केंद्रात आणि राज्यातही चांगला विकास केला, पण ज्याप्रकारे कॉंग्रेसला सत्ताकारणाचा अनुभव आहे, ते कशा प्रकारे लोकांना खोटं सांगतात, सत्तेचा दुरूपयोग करतात. आम्हाला ते करायच नाहीये, पण आम्हाला आता त्यांची खेळी समजायला लागली आहे. त्यामुळे आता आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो. मला असं वाटतं की, यापुढे हा भाजपाचा बदललेला चेहरा दिसेल. त्यात आम्ही त्यांच्यासारखा कपटीपणा करणार नाही, पण आम्ही त्यांच्या हीन राजकारणाला योग्य उत्तऱ नक्की देऊ.
सिंचन समस्या आणि दुष्काळावर बोलताना आ. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुळात काय आहे की राज्याच्या निर्मितीनंतर पाण्याचं नियोजन हा प्रायोरिटीचा विषयच राहिला नाही. योग्य नियोजन योग्यवेळी केलं असत, तर हा प्रश्‍न आला नसता. समजा आपण विदर्भाकडून निघालो तर पूर्व विदर्भात उत्तम पर्जन्य आहे. पश्‍चिम विदर्भ हा त्यापेक्षा थोडा कमी आहे. त्यानंतर मराठवाड्याकडे सरकल्यानंतर पाऊस अजून कमी होतो. मराठवाडा आणि प. महाराष्ट्रातील काही भाग हा रेन शॅडो झोन मधला आहे. पर्जन्यछायेतला आहे. तेथे पाणी अजून कमी आहे. सांगली, कोल्हापूर, सातार्‍याकडून पलीकडे कोकणात गेलो तर अतिशय पावसाचा भाग आहे. तर हे जे पर्जन्याच्या प्रमाणाचे विशिष्ट प्रकार आहेत, त्यांचा विचार करून पाण्याचे आणि पिकांचे नियोजन झाले पाहिजे होते. त्यासोबतच हा जो पर्जन्यछायेचा भाग आहे, त्या भागात ज्याला आपण ग्राऊंड वॉटर म्हणतो. भूजल पातळी ही अत्यंत खाली गेली आहे. कारण आपण भूजलाचा अनिर्बंध वापर केला आहे. आता जवळजवळ ७६ पाणलोट क्षेत्रं आता डार्क झोनमध्ये गेली आहेत. म्हणजे आता आपण कीतीही खोदलं तर पाणी लागणार नाही अशा स्थितीत जातोय आणि सरकारचा सगळा भर हे जर आपण पाहिलं तर उसाचे क्षेत्र हे पर्जन्यछायेत आहे. येथे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात, ऊस हे कॅश क्रॉप असल्यामुळे शेतकरी ते घेणे स्वभाविक आहे. त्यावर उसाचे कारखाने चालतात अशा परिस्थितीत पाण्याचं रिचार्जिंग हे देखील होणं गरजेचं होतं. ते आपण घेतलं नाही. किमान उसाला कमी पाणी लागेल अशा उपाययोजना करायला हव्या होत्या. उसाला पर्यांयी असे पैसा देणारे क्रॉप घेणे आवश्यक होते. हे आपण करायला हवे होते. ते केले नाही. ज्या भागात ऍश्यूअर्ड वॉटर आहे, बारमाही नद्या आहेत आणि सर्वात जास्त सिंचन क्षमता जेथे आपण तयार करू शकतो अशा भागात आपण धरणं तयार केली नाहीत. उदा. विदर्भ त्याठिकाणी पाणी आहे, पण तेथे धरणं केली नाहीत, असे मत आ. फडणवीस यांनी मांडले. यापाठीमागची कारणं सांगताना ते म्हणाले की, मोठी धरणं आवश्यक आहेत. पण हळूहळू आपण मोठी धरणं करत असताना त्या धरणांचं स्कॅममध्ये रूपांतर झालं. म्हणजे मोठी धरणं करायची, अनावश्यक कामं त्यातून करायची आणि पैसा कमवायचा त्याचा किती पोटेन्शिअल तयार होतोय, किती कॅनॉल होतात, किती पारसर्‍या जातात याचा विचार न करता धडधडीत पैसा खर्च करायचा. आता आपण म्हणतो की, मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी कृष्णा खोर्‍याचे मिळाले पाहिजे  आणि त्याकरिता योजना तयार केली, त्यात ७०० कोटी खर्च करून टाकले, पण ते पाणी कुठून येणार आहे, तर ते कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतून आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ४ हजार कोटींची आहे. तेथे मात्र केवळ २० कोटी खर्च केले. म्हणजे ‘‘आडात नाही तर पोहर्‍यात कोठून पाणी येणार’’ असं आपण म्हणतो तशी स्थिती आहेे. हे नियोजन पूर्णपणे कॉंट्रॅक्टर ड्रिव्हन झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत पाण्यासारखा पैसा खर्च झाला, पण पाणी काही मिळू शकले नाही आणि महाराष्ट्रात एकीकडे भूजलाची पातळी घसरली. जलसंधारणाची कामे झाली नाहीत. प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या.
महाराष्ट्राच्या विकासाबद्दल ऊहापोह करताना आ. फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा जो ग्रोथ रेट आहे तो निगेटीव्ह ग्रोथ रेट आहे. गेली दोन वर्षे पाऊस नसतानाही मध्यप्रदेशमध्ये १८ टक्के, गुजरातमध्ये ११ टक्के ग्रोथ रेट असताना आपल्या महाराष्ट्राचा मात्र वजा दोन (-२) ग्रोथ रेट आहे. यासंदर्भांत जसं अस्मानी संकट आहे  तसंच सुल्तानी संकटही आहे. हे या सरकारच्या भ्रष्टाचारातूनच तयार झालेलं संकट आहे.
सामान्य माणसाला भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे, पण तो व्यक्त करू शकत नाही. ती व्यक्त करण्याची हिंमत आणि प्रोत्साहन या दोन्हीही गोष्टी नाहीत. त्या सामान्य माणसाला ती हिंमत आणि प्रोत्साहनही द्यावे लागेल. त्याला वाटतं की, आपण हे बोलून फायदा काय? त्यापेक्षा सिस्टीमचा भाग होऊ, त्यासाठी त्यात हिंमत द्यावी लागेल. आज जी सर्वांत मोठी अडचण आहे ती म्हणजे निवडणुकांवर पैशाचा जो प्रभाव आहे. तो प्रचंड झाला आहे. राष्ट्रवादीच्या उदयानंतर तर निवडणुका या इतक्या खर्ची झाल्या आहेत.  कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने पैशे टाकतं ती फारच चिंताजनक बाब आहे. भ्रष्टाचारातून सरकारची तिजोरी लुटतात, पैसे कमवतात आणि निवडणुकीत वाटतात. हे थांबलं पाहिजे.  जनतेत प्रबोधन, कायद्यात सुधारणा, अशातून व्यवस्था सुधारेल अन्यथा लोकांनी अशी भ्रष्ट व्यवस्था स्वीकारली तर ते लोकशाहीकरिता अत्यंंत घातक आहे.
भाजपाला सत्ता मिळवून देण्याबाबत आ. देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीचा आत्मविश्‍वास आहे, याचे कारण सांगताना ते म्हणतात, भाजपात २१ व्या वर्षापासून काम करतोय किंबहूना त्याही आधी तीन वर्षे. पहिल्यांदा वॉर्डाचा अध्यक्ष झालो मग मंडल भाजपाध्यक्ष झालो. नंतर शहर युवा मोर्चात गेलो, प्रदेश युवा मोर्चा, नंंतर राष्ट्रीय युवा मोर्चात गेलो. प्रदेश भाजपात आलो आणि आता प्रदेशाध्यक्ष झालो. त्यामुळे वॉर्डस्थर किंवा गावस्थरापासून काम केलेला मी कार्यकर्ता आहे. संघटनेत काम करताना अडचणी काय आहेत. त्या मला माहिती आहेत. कार्यकर्त्यांत निराशा कशामुळे येते, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित कसे करता येते, हे मी पाहिलेले आहे, स्वत: अनुभवलेेले आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा मला होर्ईल. माझं तर मत असं आहे की, भाजपाची जी परंपरागत पद्धत आहे, प्रशिक्षण आणि प्रबोधनातून कार्यकर्ता निर्माण करणे आणि आंदोलनातून नेतृत्व निर्माण करायचे याच पद्धतीने भाजपा चालते. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाच्या खूप चांगल्या जागा वाढतील. तसा आमचा प्रयत्न आहे. रिपाइंच्या युतीमुळे दलित समाजात विश्‍वास तयार झाला आहे आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजकीय अस्पृश्यतेचा जो खेळ मांडला होता तो खेळ आता रिपाइं आमच्या सोबत आल्याने पूर्णपणे संपलेला आहे.
मनसेबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरेही सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रंणकंदन करताहेत. त्यामुळे महाराष्ट्राला सक्षम पर्यांय देणं आणि हे सरकार घालवणं असा भाजपा-सेना आणि मनसेचा कॉमन अजेंडा आहे. त्यामुळे मनसे युतीत येईल की नाही याचा निर्णय राज ठाकरेंना करायचा आहे किंवा आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला करायचा आहे. म्हणूनच हे सरकार घालवायचं असेल तर विरोधीमतांतील फुट टाळायला हवी. कमी षटकांमध्ये जास्त धावा काढण्याचं आमच्यासमोर आव्हान आहे आणि ते आम्ही साध्य करू, असा विश्‍वास आ. फडणवीस यांनी बोलून दाखवला.
भाजपाने हिंदूत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, आपला अजेंडा कायम आहे. आणि आमची जी आयडीयॉलॉजीकल भूमिका आहे ती महत्वाची आहे. भाजपाने इतर राज्यात दमदार कामगीरी केली आहे. उदा. मोदींनी विकासाचे मॉडेल तयार केले, एकीकडे धोरणांचा लकवा झालेलं सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत नाही न कोठले काम करु शकत नाही असे देशाचे संपुआ सरकार आणि आणि दुसरीकडे झपाट्‌याने विकास करणारे मोदींच सरकार यात लोकांना मोदींच सरकार उजवं वाटतं. त्यामुळे ज्यावेळी आम्ही मोदींना किंवा त्यांचे काम प्रोजेक्ट करतो.त्याच प्रमाणे शिवराजसिंह चौहान यांचेही उत्तम मॉडेल आहे, रमण सिंहांतचे ही उत्तम मॉडेल आहे. हे सर्व भाजपाचे आयकॉनिक नेते आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र राज्यात आणि केंद्रात ही भाजपाची सत्ता येईलच येईल असे ठाम मत मांडून आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘तरुण भारतच्या वाचकांना माझं एवढच सांगण आहे, माझ्याकडून वचन आहे की, राष्ट्रवाद आणि विकास या द्विसुत्रीवर जो भाजपा उभा राहीला त्या आधारावरच भाजपा पुढच्या काळात मार्गक्रमण करताना दिसेल. आणि आपल्या ज्या अपेक्षा भाजपाकडून आहेत त्या आम्ही निश्‍चतपणे पुर्ण करण्याचा प्रयत्न करु.’’ 
दै. तरुण भारत, आसमंत, दि. ५ मे २०१३.
अमर पुराणिक -
 नुकत्याच झालेल्या जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला भाजपा हवी आहे, पण मोदी नको. अशीच भूमिका मांडत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाकारण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. मुळात नितीश कुमार हे भाजपाच्या भक्कम पाठिंब्यावर आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, हे वरील विधाने करत असताना नितीश कुमार विरसत आहेत. बिहारच्या विकासातील भाजपाचे योगदान हे मोठे असतानाही नितीश कुमार ते सोयिस्कररित्या झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जर नितीश कुमारांनी बिहारचा उत्तम विकास केला असेल तर सेक्युलॅरीझमच्या कुबड्यांची त्यांना का गरज पडावी? हा प्रश्‍न पडतो. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीस विरोध करण्यामागची भूूमिका ही बिहारमधील मुस्लिम व्होट बँक गमावण्याच्या भीतीपोटी आहे हे जगजाहीर आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये हॅट्‌ट्रिक केली, ती खर्‍याखुर्‍या विकासाच्या जोरावर. सेक्युलॅरीझमच्या कुबड्या घेऊन नव्हे. विकासाची धमक, जनतेच्या सुखाची चिंता असल्यावर असल्या कुबड्यांची गरजच नरेंद्र मोदी यांना पडली नाही.
 लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप जवळजवळ १ वर्षाचा कालावधी आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. भाजपा देखील २०१४ ची निवडणूक जिंकून सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे, पण भाजपाच्या या वाटचालीत सर्वात मोठा अडथळा केला जातोय तो त्यांच्याच रालोआमधील सहकारी पक्ष जदयुकडून. भाजपाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा यासाठी प्रसारमाध्यमं, विरोधी पक्ष आणि जदयुनीच जास्त तगादा लावला आहे. विशेषत: जदयुनेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे रडगाणे सतत सुरू आहे. मतदार, भाजपा कार्यकर्ते आणि भाजपा श्रेष्ठींनी मात्र अशी कोणतीही मागणी केलेली नाही. नितीश कुमार आणि प्रसारमाध्यमांनाच भाजपाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घाई लागली आहे.
नुकत्याच झालेल्या जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला भाजपा हवी आहे, पण मोदी नको. अशीच भूमिका मांडत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाकारण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. मुळात नितीश कुमार हे भाजपाच्या भक्कम पाठिंब्यावर आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, हे वरील विधाने करत असताना नितीश कुमार विरसत आहेत. बिहारच्या विकासातील भाजपाचे योगदान हे मोठे असतानाही नितीश कुमार ते सोयिस्कररित्या झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जर नितीश कुमारांनी बिहारचा उत्तम विकास केला असेल तर सेक्युलॅरीझमच्या कुबड्यांची त्यांना का गरज पडावी? हा प्रश्‍न पडतो. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीस विरोध करण्यामागची भूूमिका ही बिहारमधील मुस्लिम व्होट बँक गमावण्याच्या भीतीपोटी आहे हे जगजाहीर आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये हॅट्‌ट्रिक केली, ती खर्‍याखुर्‍या विकासाच्या जोरावर. सेक्युलॅरीझमच्या कुबड्या घेऊन नव्हे. विकासाची धमक, जनतेच्या सुखाची चिंता असल्यावर असल्या कुबड्यांची गरजच नरेंद्र मोदी यांना पडली नाही. त्यामुळेच मुस्लिम समाजही नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे, पण नितीश कुमारांना मात्र अल्पसंख्यकांच्या, मुस्लिमांच्या मतपेट्या गमावण्याची भीती वाटतेय आणि तरीही नितीश कुमार म्हणतात की, मी एकट्यानेच म्हणजे नितीश कुमार आणि जदयुने बिहारचा विकास केला. बिहारचा त्यांनी विकास केला, हे जर खरे असेल तर व्होटबँकेच्या कुबड्यांची नितीश कुमारांना गरज असता कामा नये. गेली अनेक वर्षे प्रचंड दारिद्र्य आणि त्रास भोगलेल्या बिहारी जनतेला जात, धर्म नव्हे, तर विकासच दिसणार आहे. नव्हे तो दिसतोय आणि तरीही नितीश कुमार मोदी आणि भाजपापासून भयभित का होतात. इतकेच नव्हे, तर स्वत: गेल्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ले, त्यांना स्वत:ला निवडून येता आले नाही, स्वत:च्या जोरावर विकास करण्याची क्षमता नाही. स्वपक्षातील शिस्त राखता येत नाही ही वस्तुस्थिती असताना नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यातूनच नितीश कुमार अशी विक्षिप्त भूमिका घेत आहेत.
फाजिल महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या नितीश कुमारांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी गेल्या महिन्यात दिल्लीत शक्तीप्रदर्शन केले. ज्या संपुआच्या नावाने बोटे मोडतात त्या भ्रष्ट संपुआच्या दारात वाडगा घेऊन बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून भिक मागत होते. जर ते खरेखुरे विकासपुरुष असतील, तर बिहारच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांना हे करण्याची गरज का पडावी? नरेंद्र मोदींनी केंद्राकडून अशी कोणतीही भीक घेऊन गुजरातचा सर्वांगीण विकास केला नाही, तर तो स्वत:च्या जोरावर केला आहे. त्यांनी गुजरातच्या जनतेत प्रचंड आत्मविश्‍वास जागवला आहे आणि तेच मोदींच्या यशाचे एक महत्त्वाचे अंग आहे. उपलब्ध साधनांवर राज्याचा विकास करताना जनसहभागाचे महत्त्व ओळखून मोदींनी हे प्रभावी तंत्र वापरले. असली अनेक मोदीतंत्रं गुजरातच्या विकासाला कारणीभूत आहेत आणि हा सर्व भाग अजून नितीश कुमारांच्या गावीही नाही. भाजपाचे विकासाचे फॉर्म्युले वापरून हे नितीश कुमार भाजपाशासित गुजरातच्या विकासाची सतत टिंगल करत आहेत.
नरेंद्र मोदींच्या गुजरात विकासाच्या मॉडेलची टिंगल करताना नितीश कुमार आपण बिहारमध्ये भाजपाच्या पाठबळावर आहोत आणि भाजपा-जदयु सरकार बिहारमध्ये राज्य करतेय. भाजपा तोच फॉर्म्युला बिहारमध्येही वापरत आहे याचीही नितीश कुमारांना विस्मृती झालेली दिसतेय.
जदयु कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या घटनावरून आणि सुंदोपसुंदीवरून अनेक तर्क वितर्क सुरू झाले आहेत. कारण त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय सचिव असलेल्या शिवराज सिंह यांनी ऐन बैठकीच्या प्रारंभीच थेट नितीश कुमारांनाच आव्हान दिले. ‘मोदी विरोधात बोलायचे बंद करा आणि हिंमत असेल तर पक्षातच सेक्युलॅरिझमची चर्चा घडवून आणा,’ असे नितीश कुमारांना अडचणीत आणणारे पत्र लिहून शिवराज सिंह यांनी आव्हान दिले. नरेंद्र मोदीं यांच्याविरोधात अपप्रचाराच्या मोहिमा चालवण्यासाठी परदेशातून जदयुच्या नेत्यांना किती पैसा मिळाला; त्याचाही हिशोब द्यायची मागणी शिवराज सिंह यांनी केलेली आहे. शिवराज सिंह यांनी उपस्थित केलेले प्रश्न अतिशय गंभीर आहेत, पण नितीश कुमारांनी मात्र या मुद्द्याला फाटा दिला.
मात्र नरेंद्र मोदी यांच्यावरचे दंगलीचे आरोप व त्यांना बदनाम करण्याचे राबवण्यात आलेले कारस्थान केवळ राजकीय आहे की, त्यामागे कुणा परदेशी शक्तीचा हात आहे? असे अनेक प्रश्‍न शिवराज सिंह यांच्या आरोपामुळे उपस्थित होतात.
अशी दारूण अवस्था असतानाही ‘पडले तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे नितीश कुमार यांचा मोदीद्वेष सुुरूच आहे. ते मोदींना विरोध करायची कोणतीही संधी सोडत नाहीत. त्यांनी शिवराज सिंह प्रकरणानंतर कार्यकारिणीच्या बैठकीत अटलजींच्या ‘राजधर्मा’चा राग आळवला. ‘अटल बिहारी वाजपेयींंसारखा सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेताच देशाचा पंतप्रधान व्हायला हवा’, असे सांगताना, देश का नेता कैसा हो, अटलबिहारी जैसा हो, असा नारा देण्याची नौटंकी नितीश कुमारांनी केली.
मुळात अटलजी यांनी केलेल्या राजधर्माच्या विधानाचा विपर्यास केला गेला. तेव्हा अटलजींनी नरेंद्र मोदींबाबत ‘राज्यकर्त्यांनी राजधर्म पाळावा आणि नरेंद्र मोदी तो पाळत आहेत’, असे विधान केले होते. पण माध्यमांनी या वरील विधानाची मोडतोड करून ‘मोदींनी राजधर्म पाळावा’ असे तोडून मोडून अर्धवट विधान प्रस्तुत केले. अटलजी काय म्हणाले होते याची व्हीडिओ यु ट्यूबवर उपलब्ध आहे. ती पाहिल्यावर सर्वांच्या लक्षात येईलच की, अटलजी काय म्हणाले होते आणि त्यांचे विधान कसे प्रसिद्ध केले गेले आणि हेच विधान वापरून गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान करण्याची संधी कॉंग्रेस आणि इतर विरोधकांनी सोडली नाही. नितीश कुमार यांनी तर ही तुटकी रेकॉर्ड सतत वाजवून वाजवून गुळगुळीत केली आहे. पुन्हा जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही ही रेकॉर्ड वाजवून त्यांचेच सहकारी शिवराज सिंह यांनी केेलेले आरोप झाकण्याचा प्रयत्न केला.
अटलजींनी राजधर्म सांगितला. तो मोदींनी पाळला. नितीश कुमारजी तुम्हीही राज्यकर्ते आहात. तुमच्या राजधर्माचे काय? राजधर्म फक्त नरेंद्र मोदींनीच आणि भाजपानीच पाळायचा का, राजधर्म पाळण्याची आपली काही जबाबदारी नाही का?  स्वत:च्या डोळ्यातील मुसळ न पाहता नितीश कुमार मोदींच्या डोळ्यातील कुसळ दाखवत आहेत. आता राजधर्म काय आहे याचे चिंतन आणि त्याची पारायणं करण्याची गरज खरे तर नितीश कुमारांना आहे.
रालोआच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून सुरू असलेली नितीश कुमार यांची मनमानी आणि त्यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या जाहीर टीकेमुळे भाजपा कार्यकर्ते संतापणे सहाजिकच आहे. जदयुशी असलेली युती तोडण्यासाठी बिहारमधील भाजपाच्या  नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वावर दबाव वाढवला असून,  नितीश कुमारांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी पक्षात होत आहे.
बिहारमधील भाजपा नेत्यांनी जेदयुशी असलेली युती तोडण्याचा आग्रह धरण्याचे दुसरे कारण म्हणजे आणिबाणीनंतर जनता पार्टीच्या सरकारच्या वेळीही समाजवादी नेत्यांनी अशाचप्रकारे जनसंघाच्या नेत्यांना धोका दिला होता. नितीश कुमारही त्यांच्याच मार्गाने चालले आहेत. त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. आता माघार घेणे शक्य नाही, असा कडक सूर बिहारच्या भाजपा नेत्यांनी लावला तर ते अयोग्य कसे म्हणता येईल. नितीश कुमारांचे जुने समाजवादी सहकारी लालुप्रसाद यादव व रामविलास पासवान, याचप्रकारे भाजपाच्या विरोधातले सेक्युलर नाटक करत करत रसातळाला गेलेले आहेत.
मुळात भाजपामध्ये लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, जसवंत सिंह, अरुण शौरी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, अरुण जेटली अशी अनेक दमदार नेत्यांची फळी आहे. जे पंतप्रधान होण्यास सक्षम आहेत, पण जाणिवपूर्वक प्रसारमाध्यमं आणि विरोधक पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. भाजपामध्ये कोण पंतप्रधान होणार यावरून कोणताही वाद नाही. मागे नितीन गडकरी यांनी काही वेळात आम्ही पंतप्रधान ठरवू शकतो असे सांगितले होते ते याच बळावर आणि याच विश्‍वासावर.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या माध्यमातून नेता काय असतो, विकास काय असतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना आता आपली क्षमता सिद्ध करावी लागणार नाही; ती भारतवासीयांनी पाहिली आहे. आज देश संपुआ आणि कॉंग्रेसने रसातळाला नेला आहे. भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळलेला असताना देशाच्या विकासाचा आणि भविष्याचा पत्ताच नाही. अशा विदारक परिस्थितीत नरेंद्र मोदी हे ‘आशेची किरण’ आहेत.
आज नरेंद्र मोदी केवळ गुजरातपुरतेच लोकप्रिय नाहीत, तर देशाच्या काना-कोपर्‍यात त्यांच्याकडे देशाचा विकासपुरुष म्हणून पाहिले जातेय. राष्ट्राच्या चिंतेची भिस्त आज भारतवासी नरेंद्र मोदी यांच्यावर ठेऊ पाहतोय. वेब आणि सोशल नेटवर्किंग साईटस जसे फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, ब्लॉंगर, टंब्लर अशा अनेक साईट्‌सवर केवळ नरेंद्र मोदी हे एकच नाव धुमाकूळ घालतेय. गावोगावचे लोक केवळ भाजपा आणि नरेंद्र मोदींवर विश्‍वास ठेवतात. का? तर नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्वच्छ आणि प्रभावी धोरणे राबवत अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, प्रसारमाध्यमे, काही विशिष्ट एनजीओ, कॉंग्रेस, सेक्युलरवाले आदींच्या विरोधाचा सामना करत ही पातळी  गाठली आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण देश नरेंद्र मोदींकडे आशेने पाहतोय. हा पल्ला गाठणं नितीश कुमारांच्या दृष्टीने खूप अवघड आहे आणि खूप लांब पल्ल्याचे आहे.
अमर पुराणिक
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही मूळ स्वरूपात न देता तोडून मोडून विपर्यास्त करून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये प्रसिद्ध करतात. हे भाजपा बाबतीत कायमच होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आजच नव्हे तर गेल्या १०-१२ वर्षांपासून सातत्याने होतेय. ते याहीवेळी झाले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंगे्रसवर घणाघाती प्रहार केला. नरेंद्र मोदी यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर विकास, पक्ष बळकटीकरण, राष्ट्रप्रेम, विकासाची तंत्र, विकासाचे आर्थिक ताळेबंद, सूत्रबद्ध तंत्र, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रत्येक भारतीयाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांच्या मनात बदलाची तीव्र इच्छा निर्माण करणे, विकासासाठी इच्छाशक्ती, भ्रष्टाचार मुक्त आणि तंत्रशुद्ध कामाचा मंत्रच मोदी यांनी या भाषणात दिला, पण प्रसारमाध्यमांनी यातील केवळ राजकीय विधाने सवंग पद्धतीने प्रसारित केली आणि दूरचित्रवाणीवरून कार्यक्रमानंतर होणार्‍या चर्चांमध्ये केवळ वाक्यांचा विपर्यास्त करून नकारात्मक पद्धतीने नरेंद्र मोदींबद्दल ओकता येईल तेवढी गरळ ओकत होते.

नरेंद्र मोदी म्हटले की, सर्वसामान्य भारतीय जनतेच्या नजरेसमोर येतो एक विकासपुरुष, कणखर नेता आणि कोणत्याही संकटला न घाबरणार लढाऊ राजनीतीज्ञ. लागोपाठ तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवत केलेला गुजरातचा विकास विरोधकांसह परराष्ट्रांनाही तोंडात बोट घालायला लावणारा आहे, पण माध्यमं आणि सेक्युलरवाले गोध्राकांडातील खलनायक असेच नरेंद्र मोदींचे चित्र रंगवण्यात गेली दहा वर्षे दंग आहेत. अजूनही त्यांची डोळे उघडून वास्तव पाहण्याची आणि स्वीकारण्याची मानसिकता होत नाही, पण सतत नरेंद्र मोदींबद्दल नकारात्मक प्रचार करून एकप्रकारे या माध्यम आणि सेक्युलरवाद्यांनी एकप्रकारे मोदींची खूप मोठी मदत केली आहे. नरेंद्र मोदींना देशभरातील घराघरात नेऊन पोहोचवले, पण कीतीही खोटा प्रचार केला तरी सत्य कधीनकधी बाहेर येतेच. गेल्या दहा वर्षांत हे सत्य पुरते बाहेर आलेले आहे. याचे भान अजून यांना होत नाही. कारण गुजरात सोडून इतर सर्व भारतीयांना गेल्या दहा वर्षांत गोध्रापुराण ऐकून ऐकून सर्व भारतीयांमध्ये काय आहेत नरेंद्र मोदी? ही उत्सुकता निर्माण झाली आणि ती उत्सुकता इतकी तानली गेली की, प्रसारमाध्यमांनी सांगितलेल्या गोष्टींची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची प्रत्येक भारतीयाला इच्छा होऊ लागली. मग हा आम आदमी विचार करू लागला की, खरंच नरेंद्र मोदी इतके वाईट आहेत का? गेली १० वर्षे मोदींबद्दल ही माध्यम सांगताहेत त्याप्रमाणे मोदी खरेच राक्षसीवृत्तीचे ‘मौत के सौदागर’ आहेत का? नरेंद्र मोदींबद्दल अशा अनेक व्यमिश्र भावना लोकांच्या मनात निर्माण होऊ लागल्या. मग सतत दहा वर्षे या नरेंद्र मोदींबद्दल या नकारात्मक कथांचा प्रचार होत असताना गुजरातची जनता मात्र नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सतत भाजपा तेथे सत्तेत आहे. विकासाबाबतीत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात तळाच्या क्रमांकावर गेलेला गुजरात भाजपाची आणि नरेेंद्र मोदींची सत्ता येताच उर्जितावस्था प्राप्त करतो आणि सतत प्रथम क्रमांकावर राहतो कसा? हा प्रश्‍न प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करुलागला. आणि त्यातून मग पुढे येऊ लागले वास्तव! की मोदी हे ‘मौत के सौदागर’ नसून खरे राष्ट्रभक्त विकासपुरुष आहेत. त्यांनी प्रशासनिक, तांत्रिक, व्यापार, कृषी अशा सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पना प्रभावीपणे राबवून गुजरातला या वैभवाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. या नरेंद्र मोदींच्या विकास गाथेचे वास्तव समजल्यानंतर मात्र प्रत्येक भारतीयाला खरे नरेंद्र मोदी कळून चुकले आणि त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांचा खोटारडेपणाही उघड झाला. यात फेसबुक, ट्वीटर, ब्लॉगर सारख्या सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग हे वास्तव जाणून घेण्यासाठी झाला.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही मूळ स्वरूपात न देता तोडून मोडून विपर्यास्त करून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये प्रसिद्ध करतात. हे भाजपा बाबतीत कायमच होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आजच नव्हे तर गेल्या १०-१२ वर्षांपासून सातत्याने होतेय. ते याहीवेळी झाले. 
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंगे्रसवर घणाघाती प्रहार केला. नरेंद्र मोदी यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर विकास, पक्ष बळकटीकरण, राष्ट्रप्रेम, विकासाची तंत्र, विकासाचे आर्थिक ताळेबंद, सूत्रबद्ध तंत्र, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रत्येक भारतीयाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांच्या मनात बदलाची तीव्र इच्छा निर्माण करणे, विकासासाठी इच्छाशक्ती, भ्रष्टाचार मुक्त आणि तंत्रशुद्ध कामाचा मंत्रच मोदी यांनी या भाषणात दिला, पण प्रसारमाध्यमांनी यातील केवळ राजकीय विधाने सवंग पद्धतीने प्रसारित केली आणि दूरचित्रवाणीवरून कार्यक्रमानंतर होणार्‍या चर्चांमध्ये केवळ वाक्यांचा विपर्यास्त करून नकारात्मक पद्धतीने नरेंद्र मोदींबद्दल ओकता येईल तेवढी गरळ ओकत होते. काही माध्यमांनी तर, आपणच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचा अविर्भाव नरेंद्र मोदींच्या संपूर्ण भाषणात होता, अशा प्रकारची सवंग टीप्पणी आपल्या बातमीत केली. मोदींच्या या भाषणावर कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना विंचू आणि सापाची उपमा देऊन उद्धार केला. मोदींच्या भाषणातील अर्वाच्च भाषा ऐकता, मोदींकडे राष्ट्रीय नेता होण्याची क्षमता नाही, हे सिद्ध होते, असा जावईशोध कॉंग्रेसचे प्रवक्ता राजीव शुक्ला यांनी लावला. नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण अतिशय संयमी, सात्विक, कोठेही न घसरलेले होते. (यु ट्यूब आणि नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटवर हे संपूर्ण भाषण उपलब्ध आहे.) ५०-५५ मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी कोणावरही जहरी टीका आणि वैयक्तिक टीका केली नाही, तरीही हे कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला महाशयांना नरेंद्र मोदी यांची भाषा अर्वाच्च वाटली आणि शुक्ला यांनी मोदी हे राष्ट्रीय नेता होण्याच्या क्षमतेचे नाहीत असे प्रमाणपत्रही देऊन टाकले. कॉंग्रेेस नेते मणिशंकर अय्यर या महाशयांनी तर स्वत:ला विंचू चावल्याप्रमाणे भ्रमित होऊन मोदींनाच साप, विंचवाची उपमा बहाल केली. गुजरात दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना ‘राजधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला होता, हे मोदी विसरले का, असा सवाल नरेंद्र मोदींच्या संयमी भाषणावर कॉंग्रेसचे मंत्री मनोज तिवारी यांनी ट्विटरवर केला आहे. याला म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा. काही विकृत माध्यमांनी याही पुढे जाऊन ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा खडूस नेता असा उल्लेख केला. अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याचा उल्लेख विरोधक सुद्धा आदराने करतात. पण असा अष्लध्यपणा माध्यमांनी, काही नेत्यांनी केला आहे. माध्यमाच्या या अर्वाच्च भाषेबद्दल मात्र हे सेक्यूलरवादी, मानवाधिकार, नीतीवाल्या विचारवंत(?) मंडळींंच्या तोंडाला कुलूप घातलेले असते.
या भाषणात नरेंद्र मोदी यांनी अतिशय सुसूत्र आणि कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करणारे विचार मांडले. विकासाची अनेक सूत्रं सांगितली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठ पुरुषार्थाचा परिणाम काय असतो ते गुजरातमधील यशाचे उदाहरण देऊन सांगितले. काळाच्या कसोटीत खरी उतरलेली भाजपाची राजनैतिक संस्कृती आणि भाजपाची विचारधारा यावर असलेल्या प्रजेच्या विश्‍वासाचा परिणाम किती सकारात्मक होऊ शकतो हे मोदींनी पंडित दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देऊन सांगितले.
साधारणपणे एकाच कालावधीत स्वतंत्र झालेल्या देशांच्या म्हणजे इस्त्रायल, जपान, चीन, कोरिया आदी देशांनी प्रचंड मोठी प्रगती साधली आपण मात्र मागे पडलो. याला कारण म्हणजे राष्ट्रहीताचा विचार न करणारे, इच्छाशक्तीचा आभाव असणारे सरकार असल्यामुळे भारत मागे पडला. एका परिवाराच्या हितासाठी राष्ट्रहिताचा बळी दिला गेला. तेव्हा आपण परदेशातून मागवलेले ‘पीआयएल ४८’ गहू खात होतो. आपला कृषिप्रधान भारत देश धान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण नव्हता, पण एका लालबहाद्दूर शास्त्रींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला आणि संपूर्ण देशातील शेतकरी जागृत झाला. तो स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि देशातील धान्याची कोठार भरून टाकली. देश कायमचा धान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला.
सकारात्मक इच्छा शक्ती काय असते? त्याचा प्रभाव काय असतो? याचे मूर्तीमंत उदारण म्हणजे राष्ट्रतेज अटलबिहारी वाजपेयी असल्याचे सांगून मोदी यांनी सकारात्मक राजकारण आणि विकासाभिमुख सरकार काय करू शकते याची आठवण कार्यकर्त्यांना करुन दिली. अटलजींनी अमेरिकेसारख्या महासत्तेच्या नाकावर टीच्चून अणुचाचणी घेतली. ११ मे च्या अणुचाचणीनंतर संपूर्ण जग भडकले, भारतावर दबाब आणू लागले, तात्काळ काही तासांत आर्थिक निर्बंध लादले, पण या दबावाला भिक न घालता आत्मविश्‍वास आणि बेडरवृत्ती काय असते हे अटलजींनी दाखवून देत पुन्हा १३ मे रोजी त्याहून शक्तीशाली अणुचाचणी घेतली आणि सार्‍या जगाला दाखवून दिले की, आम्ही झुकत नाही. अटलजींनी, भाजपाने प्रचंड आत्मविश्‍वासाची प्रचिती सार्‍या जगाला दिली. त्याचबरोबर देशवासीयांना भाजपाच्या नितीमत्तेची, ताकदीची आणि राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली. त्यामुळे २१ व्या शतकातील सार्‍या जगाचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारताकडे पाहू लागले. जगाने घातलेल्या निर्बंधांना भिक न घालता देशातील, परदेशातील भारतीय आप्तजनांना अटलजींनी आवाहन केले, तेव्हा या राष्ट्रपुत्रांनी  परकीय गंगाजळीने देशाची तिजोरी भरून टाकली, अटलजींच्या आणि भाजपाच्या इच्छाशक्तीने हे करून दाखवले, पण २००४ नंतर कॉंग्रेस सरकारने हे सर्व घालवले,  हे सांगून हाच आत्मविश्‍वास पुन्हा भाजपा कार्यकर्त्यात नरेंद्र मोदींनी जागृत केला आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सारा देश जागृत करावा असे आवाहन केले.
मोदींनी प्रत्येक विकासकार्यांत जनसहभागाचे महत्त्व काय असते ते यावेळी विषद केले. जनसहभागाशिवाय सरकारच्या विकासाला गती येत नाही. ती गती जनसहभागाने कशी प्राप्त होते याचे ही उदाहरण कार्यकर्त्यांना दिले. गुजरातच्या जनतेला आवाहन केले की, १ पाऊल प्रत्येकाने पुढे यावे, म्हणजे संपूर्ण गुजरात ६ कोटी पावले पुढे जाईल. याचा खूप सकारात्मक फायदा झाला. भारतीय जनतेत असाच आशावाद निर्माण करणे, आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी प्रत्येक देशवासीयांना १ पाऊल पुढे येण्याचे आवाहन केले, तर देश १२५ कोटी पावले पुढे जाईल. हाच लोक सहभाग विकासात महत्त्वाच असतो हे मोदींनी यावेळी आवर्जून सांगितले, पण कोणत्याही प्रसारमाध्यमांनी हे मुद्दे भाजपा आणि मोदींच्या घोडदौडीच्या भीतीने प्रसिद्ध केले नाही. कॉंग्रेसने जनभागीदारीचे तत्त्व संपवून टाकले. त्यामुळेच देश विकासात मागे पडत असून, भाजपाची सरकारे ही जनआंदोलने आणि जनसहभागावर चालतात, विकास कार्यक्रमावर चालतात. दूरागामी प्रभाव पाडणारे बदल हे योग्य पुरोगामी नीतीच्या विकास कार्यक्रमामुळे होतात.
२००१ साली गुजरात सरकार ६७०० कोटी रुपये तोट्‌यात होते. पण आज ४०० कोटी नफ्यात आहे. आज वीज उत्पादनात संपूर्ण देश रसातळाला गेला आहे, पण गुजरात मात्र नफ्यात आहे. वीज उत्पादनात २००१ साली गुजरात वीज उत्पादनात २५,००० कोटी रुपये इतका तोट्यात होता, पण आता गुजरात वीज उत्पादनात ७०० कोटी रुपये नफा कमावते आहे. तेही एक पैसाही विजेचा दर न वाढवता. यासाठी काय केले तर लिकेज बंद केले. यात व्यवस्थापन, सचोटी हे पैलू महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी सांगितले. कोणतीही योजना ही कॉर्पोरेट प्लान, प्रोफेशनॅलिजम आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन यावर चालते, याचे महत्त्व मोदींनी विषद केले.
भाजपा सुशासनात क्रमांक एक वर आहे. केवळ नरेंद्र मोदीच नव्हे, तर सर्व भाजपाच्या सरकारने दमदार कामगिरी केली आहे, मध्यप्रदेश सरकार विकासाचे उत्तम मॉडेल ठरले आहे. शिवराजसिंह चौहान, डॉ. रमणसिंह, जगदीश शेट्टर, मनोहर पर्रिकर यांची भाजपा शासित सरकारे सर्वोत्तम आहेत. याआधीचे मुख्यमंत्री कल्याणसिंह, सुंदरलाल पटवा, राजनाथ सिंह यांची सरकारंही सर्वेत्तम होती. प्रजेसाठी विकास, पारंपरिकता, व्यवस्थापन, सुशासन, ही सर्वच कौशल्ये भाजपा सरकारमध्ये आहे. सर्वांनीच चांगले काम केले आहे. केवळ मोदींनी नव्हे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी आवर्जून सांगितले.
 ‘पंतप्रधान कोण होणार, नेता कोण आहे, हे  भाजपात कधीही महत्त्वाचे नव्हते व नाही. आणि भाजपात अशा उत्तम नेत्यांची वाण नाही. काय महत्त्वाचे आहे तर भाजपा महत्त्वाची आहे, महत्त्वाचे आहे लक्ष्य गाठणे आणि कर्तव्य करणे. भारतीय जनतेचा अपेक्षाभंग करण्याचा आपल्याला अधिकार नाही असे सांगून मोदींनी कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले आहे. कॉंगे्रसपासून देशाला मुक्त करणे हे देशभक्तीचेच कार्य आहे, असे मोदी यांनी सांगितले.
देशवासीयांमध्ये पसरलेला ‘आता काही होणार नाही’ हा निराशावाद काढून टाकण्याचे आवाहन मोदींनी केले. मोदी म्हणाले की, ‘देश चल पडा है|’ देशवासीयांनी कॉंग्रेस हटवण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्यामुळे आता कॉग्रेसला जनता उखडून फेकणारच आहे. २००४ ला भाजपाची सत्ता येणारच.  त्यामुळे भाजपाचे सुशासन काय आहे ते देश पुन्हा अनुभवेल. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत भारत देश जगात सर्वश्रेष्ठ ठरेल, असा प्रचंड चैतन्यमयी विचार मोदी यांनी मांडला. ‘माना के अंधेरा घना है, लेकीन दिया जलाना कहां मना है’, असा आशावादी विचार मोदींनी मांडून भाजपा कार्यकर्त्यांत, जनात आणि मनामनात असे चैतन्य दिप पेटवले आहेत.
 इतके सकारात्मक विचार मोदींनी मांडले असताना त्यांच्या आणि भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला अतिशय नकारात्मक आणि हिनपणे प्रसिद्धी देऊन भाजपाचा अश्‍वमेघ रोखण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला. भाजपा आणि विशेषत: मोदींबाबत हे सुरूच आहे. पण या सर्व नकारात्मकतेचे पितळ आता उघडे पडले आहे, जनता वास्तव काय आहे ते समजून चूकली आहे. प्रचंड संकटांना तोंड देणारी जनता २०१४ च्या निवडणूकीत कॉंग्रेसला पळता भुई थोडी केल्या शिवाय राहणार नाही.
तरुण भारत, आसमंत, १० मार्च २०१३.
अमर पुराणिक 
 हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम दर्जाला उत्तम बाजारपेठ मिळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला फक्त योग्य प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असे झाले तर चांगल्या चित्रपटांचे नक्कीच कौतुक होते, झालेले आहे. मग ते समांतर सिनेमे असूद्यात किंवा व्यावसायिक असूद्यात. भारतीय पुरस्कार देताना देखील त्याचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचे आहे. वशिलेबाजी, भ्रष्टाचाराला फाटा दिला पाहिजे. उत्तमोत्तम चित्रपटांना त्यांच्या श्रमाचे कौशल्याचे बक्षीस मिळाले पाहिजे. असे झाले तर भारतीय पुरस्कारांचे देखील महत्त्व नक्कीच वाढेल. किंबहुना ऑस्करपेक्षाही हे पुरस्कार मोठे ठरतील. त्यामुळे आपण भारतीयांनी ऑस्करसारख्या पुरस्कारांच्या पाठीमागे लागून ऑस्करचे महत्त्व नाहक न वाढवता केवळ दर्जाला महत्त्व दिले तर सनी देओलला ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरज काय?’ असा सवाल विचारायचा प्रसंग येणार नाही आणि माध्यमांना सनीच्या योग्य विधानावर विनाकारण भूवया उंचवायची संधी मिळणार नाही.

 हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सनी देओल याने, ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरजच काय?’, असे मत व्यक्त केले. सनीच्या या वक्तव्यावर माध्यमांनी बर्‍याच उलट-सुलट बातम्या दिल्या, पण एक भारतीय म्हणून विचार करता सनी देओल यात काय चुकीचे बोलला हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. भारतीय प्रेक्षकांची करमणूक करणे हेच भारतीय कलावंतांचे काम आहे आणि हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवायला हवा. सनी पुढे म्हणतो, ‘भारतीयांनी ऑस्करमध्ये जाण्यासाठी इतकी धावपळ का करावी?, आपण आपल्या देशात समाधानी नाही काय?, या देशातील पुरस्कार प्राप्त करून आपले समाधान होत नाही काय?’ असे प्रश्‍न सनी देओलने केला आहे. ‘माझे असे स्पष्ट मत आहे की, आपल्या देशातील १३० कोटी नागरिकांचे मनोरंजन करणे, हेच आपले पहिले कर्तव्य आहे’, असे मतही त्याने यावेळी व्यक्त केले.
खरं तर, सनीने उपस्थित केलेले प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. ऑस्कर पुरस्काराचे इतके महत्त्व का?, भारतीय चित्रपटांना आणि भारतीय पुरस्कारांना महत्त्व नाही का? की आपल्या आजपर्यंतच्या पाश्‍चिमात्त्यांच्या गुलामीच्या मानसिकतेचे हेही एक प्रतीक आहे?, भारतीय सिनेमांचा दर्जा कमी आहे का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.
८५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलावंतांची भूमिका असलेल्या  ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाला चार ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय कलावंतांनी या चित्रपटात काम केले असल्याने, भारतीयांना या पुरस्कारांचा आनंद होतो आहे. एका बाजूला ही आनंदाची गोष्ट असताना. दुसर्‍या बाजूला या स्पर्धेत ‘बर्फी’ या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले, पण पुरस्कार मिळाला नाही याचे दु:खही आहे. पण असे का होते याचा विचार मात्र होताना दिसत नाही.
मुळात ऑस्करचे इतके महत्त्व का? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. ऑस्करचे इतके महत्त्व वाढण्याचे कारण म्हणजे ऑस्करचा प्रचार, सातत्य, दर्जा, नावीन्याला प्राधान्य हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. यातून आजपर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. ही काही महत्त्वाची कारणे ऑस्करचा सन्मान वाढवण्यास कारणीभूत आहेत. हे भारतीय पुरस्कारांच्या बाबतीत होऊ शकत नाही का?
भारतात एनएफडीसी, राष्ट्रीय पुरस्कारांना देखील तितकाच दर्जा होता, महत्त्व होते. हे महत्त्व साधारणपणे १९९५ पर्यंत टिकून होते. पण नंतर मात्र ही पत घसरत गेली. ही पत घसरण्याला अनेक कारणे आहेत. साधारणपणे ७०-८० च्या दशकातील समांतर चित्रपट पाहिले की हे लक्षात येते की, भारतीय चित्रपटही खूप दर्जेदार होते, पण व्यावसायिकतेच्या आक्रमणात हे समांतर चित्रपट मागे पडत गेले. ओम पुरी, नसिरुद्दिन शहा, मिथुन चक्रवर्ती, स्मिता पाटील, शबाना आजमी, अमरिश पुरी, कुलभूषण खरबंदा, अनुपम खेर, मास्टर मंजुनाथ, रघुवीर यादव असे अनेक दर्जेदार कलावंत याच समांतर चित्रपटांतून पुढे आले. मृणाल सेन, गुलजार, सत्यजित रे, के. बालाचंदर, के, विश्‍वनाथ, बापू, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी असे अनेक दर्जेदार दिग्दर्शक या समांतर चित्रपटांनी दिले. मग हे चक्र का थांबले हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरस्कारांचे व्यावसायिकीकरण आणि सुमार दर्जांच्या व्यावसायिक चित्रपटांचा समांतर चित्रपटात शिरकाव आणि अशा टूकार चित्रपटांना पुरस्कार आणि भाडोत्री उदो,उदो (माध्यमांनी केलेला). समांतर सिनेमे हे केवळ ‘दाद’ आणि ‘पुरस्कार’ यांचे भूकेले असतात. समांतर सिनेमातून पैसा मिळवणे हे अशक्यप्राय म्हणावे लागेल. मग कमीत कमी उत्तम दर्जाच्या चित्रपटांना योग्य चिकित्सा करून न्याय देणे, पुरस्कार दिले जाणे महत्त्वाचे ठरते. नेमके हेच १९९५ नंतर घडले नाही. वशिलेबाजी, पुरस्कार मॅनेज करणे, पुरस्कार विकत घेणे असे अनेक भ्रष्ट प्रकार घडू लागले आणि समांतर सिनेमांचा सूर्यास्त होऊ लागला. त्याबरोबर दर्जेदार सिनेमांचाही दुष्काळ पडला. समांतर सिनेमांची व्यावसायिक सिनेमांबरोबर तांत्रिक बाबतीतच तुलना होऊ लागली आणि चित्रपटांचे विषय, गुणवत्ता दुर्लक्षिल्या जाऊ लागल्या. यामुळे पुरस्कारांचे महत्त्व आणि पत कमी होऊ लागली. राष्ट्रीय पुरस्कारांनाही पत राहिली नाही.
यासारखी अनेक कारणे, पैलू ऑस्करचे महत्त्व वाढवण्यास कारणीभूत आहेत. परदेशी चित्रपट महोत्सवामध्येही भारतीय संस्कृती आणि भारतीय दर्जेदार सिनेमे सादर झालेले किंवा त्या अनुषंगाने निर्माण केलेले सिनेमे दिसत नाहीत. ७०-८० च्या दशकात भारताचे दारिद्र्य समांतर चित्रपटांमधून, चित्रामधून मांडण्याचा प्रकार झाला आणि त्याला या परकीयांनी उचलून धरले. सहाजिकच प्रत्येक जण आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचण्यासाठी तेच करू लागला. याचा अर्थ ऑस्करवाले किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट परीक्षक, समीक्षक हे दर्जापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणच जास्त खेळत होते. ते भारतीय संस्कृती आणि आणि उत्तम दर्जेदार चित्रपट डावलत होते आणि अजूनही तेच करत आहेत. आपल्या भारतीयांनाही भारतीय संस्कृती आणि आपण भारतीय असण्याची लाज वाटते. मग अशा विषयांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेेणे आणि मांडणे ही दूरची बाब झाली. यामुळेच अभिनेता सनी देओलने मांडलेल्या मताचे महत्त्व आहे. आपल्याला आपण भारतीय असल्याचे गर्व असणे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान असणे, आपल्या कौशल्यावर विश्‍वास असणे याचे महत्त्व सनीने अधोरेखित केले आहे.
दुसर्‍या बाजूला ऑस्करसाठी चित्रपट पाठवत असताना आपले भारतीय कलावंत अनेक गोष्टीत कमी पडतात. एक म्हणजे ‘युनिकनेस’, ‘अद्वितीय’. ऑस्करसाठी चित्रपट हा वेगळ्या विषयावर असावा ही सामान्य आर्हता आहे. ऑस्करच नव्हे तर, कोणत्याही पुरस्कारांसाठी निवड व्हावी म्हणून असे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्माण करणे महत्त्वाचे असते. असे असताना अमीर खानने ‘लगान’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला. पण लगान हा चित्रपटच मुळात इंग्रजी चित्रपटावरून चोरलेला असताना आपण ऑस्कर पुरस्कार मिळण्याची अपेक्षा कशी ठेऊ शकत होतो. अमीर खानने ‘लगान’ हा चित्रपट जॉन हस्टन दिग्दर्शित आणि सिल्वेस्टर स्टॅलन, मायकल केन, फुटबॉलपटू पेले, डॅनियल मेस्सी अभिनीत १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘एस्केप टू व्हिक्टरी’ या इंग्रजी चित्रपटाची भ्रष्ट नक्कल होता. व्हिक्टरीमध्ये विषय फुटबॉलवर तर लगानमध्ये क्रिकेट इतकाच बदल होता. मग अशा चोरलेल्या चित्रपटांना कसे पुरस्कार मिळतील. ‘व्हिक्टरी’ला ऑस्करचे नामांकन मिळालेले नसताना ‘लगान’ला नामांकन मिळाले हिच आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणावी लागेल. शिवाय आंग्लसाहेबांना स्वत:चा अपमान करणारे चित्रपट कसे आवडतील.
दुसरा ऑस्करप्राप्त चित्रपट म्हणजे ‘स्लमडॉग् मिलेनियर’. या चित्रपटाने ऑस्कर पटकावला. आम्हा भारतीयांना त्याचा प्रचंड आनंद ही झाला. पण यावर आपण एक भारतीय म्हणून आत्मपरीक्षण करताना मात्र आपल्याला संताप आल्यावाचून राहत नाही. ‘स्लमडॉग मिलेनियर’सारख्या सूमार आणि घाणेरड्या चित्रपटाला ऑस्कर मिळतो हा धक्का आपल्याला बसल्याशिवाय राहत नाही. बीभत्स आणि घाणेरडे चित्रण, सुमार विषय आणि विस्कळीत कथा असतानाही या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. यापाठीमागे केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण आणि  भारतीय बाजारपेठ हेच कारण असू शकते.
आजपर्यंत ऑस्कर पुरस्कार निवडीबाबतही अनेक घोटाळे आणि आरोप झालेले आहेत, वशिलेबाजी झालेली आहे, राजनैतिक आणि आर्थिक गणिते उघडी पडली आहेत. याही वेळी  इराणमधील ओलिस नाट्यावर आधारित बेन ऍफलेक्स यांच्या ‘ऑर्गो’ या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, पण अर्गोला सर्वोत्तम चित्रपटाचा मिळालेला पुरस्कार राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप इराणचे सांस्कृतिक मंत्री मोहम्मद होसैनी यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊसचे प्रतिनिधित्व करत पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणे हे पुरस्कार मिळवण्यामागे पहिले कारण असल्याचा दावा इराणमधील प्रसारमाध्यमांनी केला आहे. इराण विरोधी चित्रपटाला पुरस्कार सोहळ्यास नामांकन देण्यात येणे आणि त्याचवेळी मिशेल ओबामा यांनी उपस्थित राहणे यामागे पाणी मुरत असल्याचे इराणच्या प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. इराण विरोधी असल्याने कोणतेही कथानक आणि तांत्रिक बाबी नसूनही अर्गो चित्रपटाला पुरस्कार दिल्याचा आरोप होसैनी यांनी केला आहे. यातून पाश्‍चिमात्त्य राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय राजकारण उघड होते.
भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये जावेत, त्यांना पुरस्कार मिळावेत म्हणून आपल्या बर्‍याच निर्मात्या, दिग्दर्शकांनी नावीन्यांच्या नावाखाली विकृतीला महत्त्व दिले, विकृत चित्रपट बनवले, केवळ बनवले नाही, तर भारतीय प्रेक्षकांवर जबरदस्ती प्रचार करून लादण्याचा प्रयत्न केला. तशी विकृत संस्कृती रुजवण्याचेही प्रयत्न झाले आहेत.
हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम दर्जाला उत्तम बाजारपेठ मिळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला फक्त योग्य प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असे झाले तर चांगल्या चित्रपटांचे नक्कीच कौतुक होते, झालेले आहे. मग ते समांतर सिनेमे असूद्यात किंवा व्यावसायिक असूद्यात. भारतीय पुरस्कार देताना देखील त्याचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचे आहे. वशिलेबाजी, भ्रष्टाचाराला फाटा दिला पाहिजे. उत्तमोत्तम चित्रपटांना त्यांच्या श्रमाचे कौशल्याचे बक्षीस मिळाले पाहिजे. असे झाले तर भारतीय पुरस्कारांचे देखील महत्त्व नक्कीच वाढेल. किंबहुना ऑस्करपेक्षाही हे पुरस्कार मोठे ठरतील. त्यामुळे आपण भारतीयांनी ऑस्करसारख्या पुरस्कारांच्या पाठीमागे लागून ऑस्करचे महत्त्व नाहक न वाढवता केवळ दर्जाला महत्त्व दिले तर सनी देओलला ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरज काय?’ असा सवाल विचारायचा प्रसंग येणार नाही आणि माध्यमांना सनीच्या योग्य विधानावर विनाकारण भूवया उंचवायची संधी मिळणार नाही.
तरुण भारत, आसमंत, ३ मार्च २०१३.
अमर पुराणिक  
अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांंभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता  देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा मात्र आपल्याला पळता भूई थोडी होणार आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.
भारतातील प्रसारमाध्यमं असूद्यात, राजकारणी जमात असू द्या  नाही तर  स्वत:ला बुद्धीजीवी समजणारे मानवतावादी आणि मानवाधिकारवाद्यांची बहुरंगी पैदास असूद्या; सगळेजण काश्मिरशी संबंधित विभिन्न प्रश्‍नांकडे योग्य दृष्टीने पाहू इच्छित नाहीत. केवळ काश्मरीच नव्हे, तर अधिकांश प्रश्‍न आणि समस्यांबाबतीत हेच झाले आहे आणि होत आहे. जम्मू, काश्मरि, लड्डाख किंवा मुंबई, दिल्ली, कोलकाता असूद्यात या सर्व बाबतीत या लोकांची अशीच भूमिका आहे.
योत काश्मिरातील हिंदूतर देशोधडीला लागलेच, पण भारताप्रती निष्ठा ठेवणार्‍या काश्मिरी मुसलमानांवरही अन्याय होतोय, मतपेटीवर डोळा ठेऊन फुटीरवाद्यांना कुर्नीसात करत लांगुलचालन केले जाते आहे. भारतीय जवानांकडून यदाकदाचित मानवधिकाराचे उल्लंघन झाले तर हे तथाकथित मानवाधिकारवाले बुद्धीजीवी आकाशपाताळ एक करतात. यासाठी जाणीवपूर्वक केल्या जाणार्‍या गदारोळात भारतीय सेनेला बदनाम केले जाते. पाकिस्तानी आणि फुटीरवाद्यांच्या षड्‌यंत्राला पोषक अशी विधाने करत त्यांच्या सुरात सूर मिसळून गरळ ओकू लागतात आणि स्वत: प्रखर मानवतावादाचे पाईक असल्याचे ढोल बडवले जातात. याच पद्धतीने राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या महत्त्वपूर्ण संवैधानिक पदावर बसलेले वजाहत हबीबुल्लाह सारखे लोक जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर स्वैर आरोप करत भारतीय सेनेला आरोपीच्या पिंजर्‍यात ओढण्याचे दुष्कृत्य करत भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणात नाचक्की करतात. अफझलच्या फाशीवरून हे सेक्युलरवाले आणि प्रसारमाध्यमे असेच राष्ट्रद्रोही तुणतुणे वाजवत आहेत आणि काश्मिरी जनतेची चिंता सोडून अफझल सारख्या क्रूर दहशतवाद्याचा कैवार घेत आहेत. 
१३ डिसेंबर २००१ च्या ‘त्या’ भीषण हल्ल्यात सात जवान, एक माळी आणि एक छायाचित्रकार शहीद झाले. अर्ध्या तासाच्या चकमकीत सर्व अतिरेक्यांचा फडशा पाडत संसदेवरील तिरंगा ताठ मानेने फडकत ठेवणार्‍या या जवांनांच्या शौर्याला तोड नाहीच. पण त्यांच्या शौर्याची राज्यकर्त्यांना कोणतीच किंमत नाही. त्या जवानांच्या आप्तांनी शौर्यपदके सरकारला परत केली. याची लाजही या संपुआ सरकारला वाटली नाही. केवळ मतांचे राजकारण करत दहशतवाद्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य मात्र केले. याचा परिणाम मात्र असा झाली की, हल्ल्यांमागून हल्ल्यांची मालिका सुरूच राहिली आहे. त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत.
अफझलच्या फाशीनंतर देशात अशा लोकांकडून हेच प्रकार करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. काश्मिरात हिंसाचार तसा नवा नाही, पण अफझलच्या फाशीनंतर काश्मिरात हिंसाचार माजला आणि कर्फ्यू लागू करण्यात आला. गेल्या दोन दशकांत झालेल्या काश्मिरी हिंदू पंडिताच्यानरसंहाराची कोणालाही चिंता वाटली नाही. काश्मिरातील मशिदीतून खूलेआम राष्ट्रद्रोही कृत्ये घडत असताना, उघड उघडहिंदूंना अल्टिमेटम दिले जात होते की, जर जिवंत राहायचे असेल तर काही तासांत काश्मीर सोडून निघून जा! अशा आशयाचे पोस्टर्स काश्मिरातील गल्लोगल्ली लागत असल्याच्या अनेक बातम्या गेल्या वीस वर्षांत आपण वाचल्या आहेत. हिंदूंना अशा धमक्या देऊन काश्मिरातून पळवून लावणार्‍यांकडून अफझलच्या फाशीनंतर काश्मिरात हिंसाचार घडवून आणत अफझलच्या फाशीबद्दल नक्राश्रू वाहणार्‍या फुटीरवाद्यांकडून अशीच राष्ट्रद्रोही अपेक्षा असू शकते.
काश्मीरात अशी अवस्था तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी दहशतवादी अफझलच्या समर्थनासाठी राष्ट्रद्रोही नारे देत, भारत मुर्दाबादच्या घोषणा देतात हा तर कहरच म्हणावा लागेल. ‘‘अफझल तेरी याद में रो रही ये जमीं, रो रहा आसमॉं, अफझल के वारिस जिंदा है, आय ऍम अफझल, हँग मी टू इंडिया वी ऑल आर अफझल, भारत मुर्दाबाद’’ ही भारतविरोधी घोषणाबाजी पाकिस्तानात नव्हे तर भारतातच होते हे संतापजनक आणि दुर्दैवी  म्हणावे लागेल. या देशाचे मीठ खाऊन याच देशावर हल्ला करणार्‍या अफझलचा एवढा या पाकधार्जिण्यांना पुळका आहे. दहशतवादी अफझलचा कैवार घेत शेकडो मुस्लिम विद्यार्थ्यांनी अलीगढ विद्यापीठाच्या आवारामध्ये जोरदार मोर्चा काढतात. ‘शहीद मिस्टर अफझल गुरू’ वगैरे आशयाचे फलक घेऊन अफझलला फाशी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप व्यक्त करतात. एवढेच नव्हे तर  ‘यू किल्ड वन अफझल अँड गेव बर्थ टू हंड्रेड अफझल’ अशा धमकीवजा घोषणाही देण्याचा कहर केला गेला आणि यावेळी साध्वी प्रज्ञासिंह व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशी देण्याची मागणीही करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या निदर्शनाकडे विद्यापीठ आणि सतत सेक्युलरवादाची जपमाळ ओढणार्‍या केंद्र सरकारने आणि मुस्लिमधार्जिण्या मुलायम सरकारने पूर्ण कानाडोळा केला.
याउपर तिसरा प्रकार म्हणजे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा (जेकेएलएफ) नेता यासिन मलिक हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-ऊद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हफीज सईद याच्याबरोबर अफजलला फाशी दिल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आयोजित केलेल्या शोकसभेत  जाऊन उपोषणात सहभागी झाला.
यासिन मलिकला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलीच कशी, सरकारने त्याचा व्हिसा मंजूर केला कसा, हा प्रश्‍न उपस्थित होतो. मलिक पाकमध्ये जाऊन मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईद याची भेट घेतो आणि अफझलला श्रद्धांजलीही वाहतो यावरून यासिन मलिकचे दहशतवादी हाफिज सईदसोबत जवळचे संबंध असल्याचे सिद्ध होते. पाकिस्तानात अफझलला श्रद्धांजली वाहिली जाते हे एकबाजूला होत असताना भारताचे नागरिक असलेले मुसलमान विद्यार्थी मात्र न्यायाधीशांचा आणि न्यायव्यवस्थेचा अवमान करत देशविरोधी घोषणा देतात. यावर आपले राज्यकर्ते एक चकार शब्द काढत नाहीत आणि नसलेल्या भगव्या दहशतवादावर वाट्टेल तशी वाह्यात विधाने करतात. हा भ्रष्ट आणि सत्तालोलूप सोनिया सरकारच्या निस्संगपणाचा कळस झाला. या काही अलिगढ मुस्लिम विद्यार्थ्यांच्या देशद्रोही भूमिकेमुळे या देशातील सच्च्या देशभक्त मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर संशय घेतला जातो याचे भानही हे देशद्रोही कृत्य करणार्‍यांना नव्हते आणि नाही.
तब्बल बारा वर्षांनंतर अफझलला फाशी दिली गेली. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर अजमल कसाबच्या फाशीलाही विलंब लावला. याचे कारण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील या फाशीच्या कागदपत्रांवर सही करत नाहीत, असे दिले जात होते. मिसाईल मॅन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत फाशीची कागदपत्रे पोहोचू दिली जात नव्हती. असे असताना सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र कसाब आणि अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. त्याचे श्रेय मात्र प्रणवदांना दिले जात नाही. सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यावर ‘मी केले’चा ढोल बडवत आहेत. फाशीचा मार्ग मोकळा करणारे प्रणवदा राहिले बाजूला आणि फाशीबद्दल सोनिया-शिंदेच पाठ थोपटून घेताहेत. हा दुटप्पी राजकारणाचा नमुना पाहिल्यावर राष्ट्ररक्षेला तिलांजली देत निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, दहशतवादाच्या मुद्द्याच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करत आम जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करत सत्तापिपासूवृत्तीचे राजकारण कॉंग्रेसकडून खेळले जातेय.
या देशातील कॉंग्रेस सरकार, सोनिया गांधी, फुटीरवादी, मानवाधिकारवाले, सेक्युलरवाले, प्रसारमाध्यमे यांनी आपल्यासारख्या तथाकथित भारतीय बुद्धीजीवी नागरिकांची सतत सेक्युलरवादी विचारांचा मारा करून आपली वैचारिक सूंता केली आहे. आता बरेचशे भारतीय नागरिक आता अशा राष्ट्रद्रोही सेक्युलॅरिझमच्या मार्‍यामुळे कोणतीही राष्ट्रद्रोही घटना खूप सहजतेने घेऊ लागले आहेत आणि जनता ‘चलता है|, होता है,’ म्हणत आत्मकेंद्री बनली आहे. असे करण्यात माध्यमे, सेक्युलरवाले यशस्वी झाले आहेत आणि हे अतिशय घातक ठरणार आहे. कोणतीही देशविघातक घटना घडली की केवळ मेणबत्त्या लावून किंकर्तव्यमुढासारखे थंड बसतात. आणि सर्व विसरून आपले लाईफ एन्जॉय करण्यात मग्न होतात. त्यामुळे अफझलला फाशी दिली काय, देशाचा अवमान झाला काय, अस्मितांना धक्का लागला काय; सर्वबाबतीत आपल्या भावना बोथट होऊन गेल्या आहेत.(की केल्या गेल्या आहेत.) त्यामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांंभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा मात्र आपल्याला पळता भूई थोडी होणार आहे. याचा विचार आता खूप गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. 
तरुण भारत, आसमंत, १७ जानेवारी २०१३.  
अमर पुराणिक
आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून सांगावे लागणार आहे की, भारत दहशतवादाला खतपाणी घालत नाही. हिंदू दहशतवाद नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जन हो, आपली राष्ट्रीय धोरणे हे कॉंग्रेस सरकार आंतरराष्ट्रीय समुदायात पटवून देऊ शकत नाही, समजावून सांगू शकत नाही, तर या गोष्टी समजावून सांगणे या कॉंग्रेसला काय जमणार आहे. शिंदे साहेबांची जीभ सरकली असेल असे सारवासारवीचे विधान कॉंग्रेसकडून माध्यमाद्वारे करून यावर एकवेळेस पांघरुण घातले जाईलही, पण जागतिक समुदायात हे पटवून देऊ शकणार का?
रायपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘संघ-भाजपाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते’, असे अविचारी आणि प्रक्षोभक विधान केले. देशात जातीय शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य विसरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशात हिंदू आणि मुस्लिम अशी उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सर्व स्तरांतून होत आहे. शिंदे इतके बोलून थांबले नाहीत तर, रा. स्व. संघ आणि भाजपाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असते आणि बॉम्बस्फोट करून ते मुस्लिमांना बदनाम करीत असतात, असे धक्कादायक विधानही शिंदे यांनी कॉंगे्रसच्या चिंतन शिबिरात केलेे. समझोता एक्स्प्रेस, मक्का मशीद आणि मालेगाव येथील बॉम्बस्फोटात हिंदू दहशतवाद्यांचाच हात असल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या टिप्पणीने सार्‍या देशात संतापाची लाट उसळली. नंतर मात्र जनक्षोभाच्या भीतीने त्यांनी घुमजाव करत मी ‘हिंदू दहशतवाद’ असे म्हणालोच नाही तर ‘सफ्रॉन टेररिझम’ असे म्हणाल्याची सारवासारव केली. या दोन्ही शब्दांत फरक असला तरी साधारणपणे अर्थ सारखाच होतो.
सुशीलकुमार शिंदे हे एका जबाबदार देशाचे जबाबदार गृहमंत्री असून, ते आपली जबाबदारी विसरले. मुळात परराष्ट्र धोरण नावाची चिज शिल्लक नसलेल्या संपुआ सरकारने कमीत कमी देशांतर्गत गोष्टीबाबत तरी योग्य, राष्ट्रपोषक व संयमित विधाने करायला हवीत. कमीत कमी विरोधी राष्ट्रांच्या हतात आयते कोलीत मिळणार नाही याचा तरी विचार करणे गृहमंत्र्यांकडून अपेक्षित असते. राजकीय मतभेदातून शिंदे असे बोलले असे म्हणण्याचे कारण नाही. कारण ते कॉंग्रेसचे नेते असले तरी आता देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी वाढते. हे विसरून जर शिंदे असे बेछूट आरोप करत असतील, तर मात्र त्यांना राष्ट्रहितापेक्षा सत्ता ताब्यात ठेवण्याची चिंता सतावतेय असे म्हणावे लागेल.
एकटे शिंदेच नाहीत तर या आधीचे गृहमंत्री आणि आताचे अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनीही सन २०१० मध्ये अशीच बेजबाबदार विधाने केली होती. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे तर कायम अशी वाह्यात विधाने करीत असतात. शिंदे यांच्या या विधानावर कॉंगे्रसचे नेते मणिशंकर अय्यर यांनीही शिंदे यांच्या मताशी सहमती दर्शवत त्यांनी वादात तेल ओतण्याचा प्रयत्न केला. प्रखर राष्ट्रभक्त असलेले भाजपा-संघ परिवार या विधानावर संतप्त होणे साहजिकच आहे. भाजपा-संघाने यावर शिंदेच्या हकालपट्टीची मागणी केली. भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी भगवा हा वैराग्याचे प्रतीक असून, आतंकवादाच्या विरोधात आहे. भगवा आमची परंपरा आहे, भगवा ही भारतीय संस्कृती आणि त्यागाचे प्रतीक आहे, असे असताना सुशीलकुमार शिंदे अशी विधाने करतात, त्यांनी समस्त देशवासीयांचा अपमान केला असून, देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. संघ-भाजपा हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे ते सांगतात. मग, थेट पुरावे सादर का करीत नाहीत? त्यांना कोणी अडवले आहे. जर पुरावे नसतील तर शिंदे तरी कोठून पुरावे आणणार.
दूसर्‍या बाजूला या विधानाने देशाचा क्रमांक एकचा शत्रू पाकिस्तान आणि आतंकवादी मात्र प्रचंड खुष झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे हे आता आतंकवाद्यांचे लाडके झाले आहेत. त्यांना जमात-उल-दावाने या विधानाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने शब्बासकी दिली आहे. शिंदे साहेबांचे ‘श्री’ हफिज सईद ‘यांच्या’ आनंदाला तर पारावार राहिलेला नाही. हा नराधम सईद म्हणतोय की, ‘सुशीलकुमार शिंदे का यह बयान एक दम सच है|’ हाफिज सईद म्हणतो शिंदे यांचे हे विधान म्हणजे अल्लाहकडून ही पाकिस्तानला मदत आहे. एवढेच नव्हे तर भारत पाकिस्तानवर इतकी वर्षे विनाकारण दहशतवादाचे खोटे आरोप करत आहे. याला म्हणतात आपणहून आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे! आंतरराष्ट्रीय स्थरावर हे अतिरेकी आता पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत नसून भारत घालतोय हे ओरडून सांगायला मोकळे झाले. नव्हे तसे ते आता शिंदेंच्या विधानामुळे गळा फाडून सांगू लागले आहेत.
आपलेे हे वक्तव्य खर्‍या दहशतवाद्यांचे मनोबल वाढविणारे आणि पाकप्रायोजित दहशतवादाला प्रोत्साहन देणारेच असल्याचा विचारही गृहमंत्र्यांनी हे विधान करण्यापूर्वी केला नाही. त्यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी देशाचे गृहमंत्री असूनही मुस्लिमांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून हिंदू आणि मुस्लिमांत तणाव निर्माण करण्याचा आणि देशातील शांतता आणि जातीय सलोखा भंग करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. यातून खर्‍या दहशतवाद्यांना पकडण्याची ताकद आपला देश अशा गृहमंत्र्यांमुळे गमावून बसला आहे. सीमेवर पाकिस्तानचे सैनिक आणि अतिरेकी भारतीय हद्दीत घुसखोरी करतात. हे सिमोल्लंघन सततच सुरूच असते. भारतीय जवानांचा शिरच्छेद करून एका जवानाचे शिर पळवून नेतात आणि आपले सरकार व कॉंगे्रस पक्ष पाकिस्तानशी चर्चाच करतोय, क्रिकेट सामने खेळतोय हे लांच्छनास्पद आहे. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळते, मात्र आपले सरकार, गृहमंत्री आणि पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. मुस्लिम मतांच्या लांगूलचालनात राष्ट्रहिताचे धिंडवडे हा कॉंग्रेस पक्ष काढतोय.  मुस्लिमांचे लाड पुरविणार्‍या आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या कॉंगे्रस पक्षाने सत्तेवर येताच, पोटासारखा प्रभावी कायदा रद्द करून दहशतवाद्यांना हैदोसासाठी देश मोकळा करून दिला.
इतकेच नव्हे तर आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून सांगावे लागणार आहे की, भारत दहशतवादाला खतपाणी घालत नाही. हिंदू दहशतवाद नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जन हो, आपली राष्ट्रीय धोरणे हे कॉंग्रेस सरकार आंतरराष्ट्रीय समुदायात पटवून देऊ शकत नाही, समजावून सांगू शकत नाही, तर या गोष्टी समजावून सांगणे या कॉंग्रेसला काय जमणार आहे. शिंदे साहेबांची जीभ सरकली असेल असे सारवासारवीचे विधान कॉंग्रेसकडून माध्यमाद्वारे करून यावर एकवेळेस पांघरुण घातले जाईलही, पण जागतिक समुदायात हे पटवून देऊ शकणार का? हाच एक मुद्दा धरून पाकिस्तान, आयएसआय, अतिरेकी आपल्या देशाला नाचवू लागले तर मग मात्र अवघड होऊन बसेल. एवढ्या एका मुद्द्याने असे होणार नाही हे आम्हालाही कळते. पण अशी सतत विपरित विधाने करून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला भारताविरुद्ध जागतिक मत खराब करण्यासाठी रेकॉर्ड निर्माण करू दिले जाता कामा नये.
भ्रष्टाचार, बलात्कार आणि विकासशून्य अशा धोरणांमुळे यावेळी जनता कॉंग्रेसला धोबीपछाड देणार हे आता निश्‍चितच आहे. निवडणुका जवळ आलेल्या पाहून या पक्षाला पुन्हा एकदा गरीब आणि मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे. कॉंग्रेस पक्ष या वर्गांना नेहमीच धोका देत आलेला, आधीची आश्‍वासने पूर्ण न करणारा कॉंगे्रस पक्ष त्यांना आता नवे स्वप्न दाखवीत आहे. पंतप्रधान, सोनिया गांधी तर धडधडीत ‘आम्ही सर्व अश्‍वासने पूर्ण केली असे सांगत आहेत. या बेजबाबदार विधानाबद्दल शिंदे आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागायला हवी होती, पण शिंदे यांनी हायकमांडला खुष करण्यासाठी हे विधान केले असून, या मागे कॉंग्रेसचे मतांचे राजकारण आहे. कॉंग्रेसचे चिंतन शिबीर ‘चिंतनासाठी नव्हे, तर राहुल गांधींना युवराजपदाचा राज्याभिषेक करण्यासाठी आणि कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते यांच्या गळी राहुलचे नेतृत्व उतरवण्यासाठी हे शिबीर घेतले होते. 
तरुण भारत, आसमंत, दि. ०३ फेब्रूवारी २०१३.